भारताच्या लोकपाल अध्यक्षांची नियुक्ती, नऊ सदस्यांसह भारतीय लोकपाल कार्यालयाचा शुभारंभ
लोकपाल कार्यालय आता पूर्ण क्षमतेने सुरू
नवी दिल्ली दि-13 मार्च ,भारताचे लोकपाल अध्यक्ष न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांनी आज सकाळी नवी दिल्ली येथे भारतीय लोकपाल संकुलामध्ये आयोजित कार्यक्रमात पुढील व्यक्तींना भारतीय लोकपालाचे न्यायिक सदस्य आणि सदस्य म्हणून शपथ दिली:
न्यायिक सदस्य:
• न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी
• न्यायमूर्ती संजय यादव
सदस्य
1. सुशील चंद्रा
न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी, भारताच्या लोकपालचे न्यायिक सदस्य म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि ते कर्नाटक उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.
न्यायमूर्ती संजय यादव, भारताच्या लोकपालचे न्यायिक सदस्य म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि ते अलाहाबाद उच्च न्यायालय आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत.
सुशील चंद्रा हे 1980 च्या तुकडीतील आयआरएस (आयटी) अधिकारी आहेत. भारताच्या लोकपालचे सदस्य म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी, ते भारताचे 24 वे मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि यापूर्वी त्यांनी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम केले आहे.
आज तीन नवीन सदस्यांचा शपथविधी झाल्यामुळे भारताचे लोकपाल कार्यालय आता अध्यक्षांसह नऊ सदस्यांच्या पूर्ण संख्याबळाने कार्यरत आहे.
वरील सोबत दिलेल्या फोटोत
(डावीकडून उजवीकडे) न्यायमूर्ती संजय यादव, न्यायिक सदस्य, महेंद्र सिंह, सदस्य, डी.के. जैन, सदस्य, न्यायमूर्ती पी.के. मोहंती, न्यायिक सदस्य, न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर, अध्यक्ष, न्यायमूर्ती अभिलाषा कुमारी, न्यायिक सदस्य, अर्चना रामसुंदरम, सदस्य, न्यायमूर्ती लिंगप्पा नारायण स्वामी, न्यायिक सदस्य, सुशील चंद्रा, सदस्य.
आजच्या कार्यक्रमाला लोकपालचे सदस्य, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, अध्यक्ष, भारत आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र (IIAC), न्यायमूर्ती इंदरमीत कौर कोचर, सदस्य, महानदी जल विवाद न्यायाधिकरण (MWDT), न्यायमूर्ती रवी रंजन, सदस्य (MWDT), प्रवीण कुमार श्रीवास्तव, केंद्रीय दक्षता आयुक्त, अरविंदा कुमार, दक्षता आयुक्त आणि सीबीआय आणि ईडीचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.