Advertisement
जळगावराजकीय

भुसावळ: गायत्री भंगाळे यांनी स्विकारला नगराध्यक्ष पदाचा पदभार, माजी आमदार संतोषभाऊ चौधरी उपस्थित

ट्वेंटी ट्वेंटीचा सामना खेळणार - संतोषभाऊ चौधरी

भुसावळ – नगरपरिषदेच्या नुतन लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.गायत्री चेतन भंगाळे यांनी आज त्यांच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलेला आहे. याप्रसंगी त्यांच्यासोबत माजी आमदार संतोषभाऊ चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक उल्हास पगारे यांचेसह इतर विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

पाणी प्रश्न सोडविणार – नगराध्यक्षा
भुसावळ शहरातील रखडलेले विविध प्रकारचे विकास कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी म्हटलेलं आहे.
ट्वेंटी ट्वेंटीचा सामना खेळणार – संतोषभाऊ चौधरी
भुसावळच्या रखडलेल्या विकास कामांना प्राधान्य देण्यात येणार असून, त्यासाठी उद्यापासूनच ट्वेंटी ट्वेंटीचा सामना खेळणार असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी दिली आहे.
यावेळी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांनी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगराध्यक्षांनी अधिकाऱ्यांकडून नगरपरिषदेच्या विविध विभागांची कार्यपद्धती समजून घेतली. यावेळी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे सासरे नारायण भंगाळे,पती चेतन भंगाळे हे देखील यावेळी उपस्थित होते.
दरम्यान , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले, उपमुख्याधिकारी परवेझ अहमद,कार्यालय अधिक्षक वैभव पवार, यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button