मंगेशपर्व ! गाजलेली आमसभा,अभूतपूर्व विकासाचा महामेरू,अमित शाहांनी केलेलं कौतुक, आ.मंगेश चव्हाण यांना मिळणार मोठी जबाबदारी
जळगाव जिल्ह्यात नव्या नेतृत्वाचा उदय !
जळगाव, दिनांक- 26/11/2024 नुकत्याच विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती लागलेले असून जळगाव जिल्ह्यातील सर्वच 11 जागांवर महायुतीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत. जळगाव जिल्ह्यात सुरुवातीला सर्वात लक्षवेधी आणि अत्यंत चुरशीची काटाफाईट लढत मानल्या गेलेल्या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपचे विद्यमान आमदार मंगेश चव्हाण यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माजी खासदार उन्मेश पाटील यांचा 85,653 हजारांंनी मोठा दणदणीत पराभव करून चाळीसगावच्या इतिहासात सर्वोच्च मताधिक्य घेऊन विक्रम केलेला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांना एकूण 1,57,101 एवढी प्रचंड मते पडलेली आहे. निवडणुकीच्या वेळी अत्यंत ‘टफफाइट’ म्हणून ओळखल्या गेलेल्या निवडणुकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी एकाहाती आणि एकतर्फी अविस्मरणीय विजय मिळवून सर्वच अंदाज फोल ठरविलेले आहे. त्यांच्या या विजयाच्या प्रचंड यशामध्ये त्यांनी गेल्या अडीच वर्षांच्या महायुतीच्या काळात केलेल्या अभूतपूर्व विकास कामांमुळे आणि त्यांनी उभ्या केलेल्या युवकांच्या जबरदस्त संघटन कौशल्याच्या बळावर सर्वच जाती-धर्मांच्या उत्सवांमध्ये सहभागी होऊन जातीय व धार्मिक सलोखा कायम राखण्याचे काम केलेले आहे. तसेच अनेक गावागावांमध्ये अनेक जाती धर्मांची सामाजिक सभागृहे उभारून अनेक समाजांना न्याय मिळवून देण्याचे काम केलेले आहे. चाळीसगाव शहरासह तालुक्यातील प्रत्येक गावांमध्ये जात समूह न बघता केलेली शेकडो कोटींच्या गतिमान विकासाची कामे यामुळे मतदारांनी एकसंध राहून त्यांच्या पारड्यात भरघोस मतदान केलेले आहे. विशेष म्हणजे चाळीसगावात झालेल्या जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाषण करताना मंगेश चव्हाण यांनी केलेल्या विकासकामांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करताना मोठा दावा देखील केलेला आहे की, आमदार मंगेश चव्हाण यांच्या धडाडीच्या विकास कामांची माहिती घेतल्या नंतर असं वाटतंय की, हे मंगेशदादा माझ्या मतदारसंघात उभे राहिल्यास माझी जिंकून येण्याची शक्यता सुद्धा मला कमी वाटू लागलेली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर सभेत केलेले हे वक्तव्य निश्चितच आमदार मंगेश चव्हाण यांचं केंद्रीय पातळीवर मोठे वजन वाढवणारे असल्याचे स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे त्यांना चाळीसगाव पुरते मर्यादित न ठेवता आगामी काळात पक्षातर्फे मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत मिळालेले आहेत. काही महिन्यांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार मंगेश चव्हाण यांना त्यांचा राजकीय वारस घोषित केलेले होते.
आमसभा ठरली होती चर्चेचा विषय
मार्च महिन्यात चाळीसगाव शहरात झालेल्या विधानसभा मतदारसंघाच्या आमसभेत संपूर्ण तालुक्यातून सर्वच जाती-धर्माचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांनी आयोजित केलेल्या आमसभेत त्यांचे प्रश्न मांडलेले होते. ही आमसभा संपूर्ण राज्यात मोठी गाजलेली होती. गेल्या पाच वर्षात राज्यात केवळ चारच आमदारांनी आमसभा घेतलेली असून त्यात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचा समावेश होतो. चाळीसगावात झालेल्या या आमसभेत सर्वच प्रशासकीय यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. या आमसभेत प्रत्येक नागरिकाने त्याच्या मांडलेल्या समस्यांचे तात्काळ संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत जागीच निराकरण करून त्यांना न्याय मिळवून देण्याची अविश्वसनीय कामगिरी आमदार मंगेश चव्हाण यांनी पार पाडलेली होती. या आमसभेमुळे आमदार मंगेश चव्हाण संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनलेले होते. अल्पावधीतच चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा पाठपुरावा, त्यासाठी गतिमानतेने आणलेली प्रशासकीय मान्यता, मंजूर करून आणलेल्या हजारो कोटींचा निधी, संपूर्ण तालुक्यात हजारो कोटींच्या कामांची प्रत्यक्षात आणलेली विकासगंगा आणि प्रत्येक गल्लीबोळात केलेल्या विकासकामांच्या झंझावातामुळे स्वतःच किंगमेकर होऊन त्यांच्यासाठी विजयश्री खेचून आणून चाळीसगावात पुन:श्च नव्या मंगेशपर्वाची सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.आमदार मंगेश चव्हाण हे मराठा समाजाचे युवा नेतृत्व असल्याने येणाऱ्या काळात त्यांना मंत्रिपद मिळाल्यास आश्चर्य वाटायला नको. तूर्तास इतकेच.