रावेर आणि जळगाव लोकसभा मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि राजकीय अनुभव किती ?
जळगाव जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला असून गेल्या पंधरा वीस दिवसांपासून प्रचंड तापलेल्या उन्हाच्या तडाख्यात निवडणुकीचे वातावरण सुद्धा खूप तापलेले दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आणि पदाधिकारी यांनी जाहीर सभांमधून विरोधकांवर जोरदार हल्ला चढवून राजकीय आरोप प्रत्यारोप करून सभा गाजवलेल्या आहेत.तसेच जनतेच्या आणि मतदारसंघाच्या हितासाठी कोणता उमेदवार नेमकं काय कामं करणार आहेत, याचंही उमेदवारांनी जाहीर सभेत आश्वासन दिलेले आहे.
मात्र दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी निवडून येणे सर्वात आधी महत्त्वाची आहे. तसेच जनतेचे प्रश्न संसदेत मांडण्यासाठी उमेदवार हा उच्चशिक्षित,अभ्यासू आणि राजकीय अनुभव असणे हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीत मतदारांकडून बघितला जातो. रावेर आणि लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत काही प्रमुख उमेदवारांनी त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या शैक्षणिक पात्रतेची माहिती दिलेली आहे. त्यातील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांची शैक्षणिक माहिती खाली दर्शवलेली आहे. कोणता उमेदवार किती शिकलेला आहे याची माहिती उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे या लेखात दिलेली आहे.
रावेर लोकसभा प्रमुख उमेदवार
1) उमेदवाराचे नाव -श्रीराम दयाराम पाटील
पक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट
शिक्षण -12 वी
राजकीय कारकीर्द – पहिल्यांदाच थेट लोकसभा
निवडणुकीच्या रिंगणात
2) उमेदवाराचे नाव- रक्षा निखिल खडसे
पक्ष- भारतीय जनता पक्ष
शिक्षण – बी.एस्सी (कॉम्प्युटर)
राजकीय कारकीर्द – यापूर्वी सलग दोन टर्म रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार
3) उमेदवाराचे नाव- संजय पंडित ब्राह्मणे पक्ष- वंचित बहुजन आघाडी
शिक्षण- पदविका स्थापत्य अभियांत्रिकी
राजकीय कारकीर्द – यापूर्वी भुसावळ विधानसभा निवडणुक लढविली होती,मात्र पराभव
जळगाव लोकसभा प्रमुख उमेदवार
1) उमेदवाराचे नाव-स्मिता उदय वाघ
पक्ष – भारतीय जनता पक्ष
शिक्षण-पदवी मानसशास्त्र
राजकीय कारकिर्द-यापूर्वी विधानपरिषदेवर सदस्य
2) करण बाळासाहेब पाटील पवार
पक्ष- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
शिक्षण- बी.ए.
राजकीय कारकीर्द- यापूर्वी पारोळा नगर परिषदेचे नगराध्यक्ष