शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्यांना हटवू शकत नाही ! तर 2018 मध्ये आदित्य ठाकरेंना वशिल्याने नेते पद मिळाले ? निकालाचा अन्वयार्थ

मुंबई दि-10 ,शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीला विधिमंडळात सुरूवात झाली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेआधी शिवसेना कुणाची याचा निर्णय घेतला जाईल, असं सांगितलं. हा निकाल देताना राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या घटनेचा आधार घेतला. शिवसेनेच्या 2018 च्या सुधारित संविधानाची निवडणूक आयोगाकडे नोंद नाही, 2018 ची घटना उद्धव यांच्या बाजूच्या गटांनी लपून आणल्याचे प्रतिवादीने सादर केले आहे, असं निरिक्षण विधानसभा अध्यक्षांनी मांडलं.
2018 साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत, त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे. 2018 च्या संविधानावर अवलंबून राहावे असा याचिकाकर्त्यांचा (उद्धव गट) युक्तिवाद स्वीकारू शकत नाही. ठाकरेंना केलेली घटना दुरूस्ती नियमबाह्य आहे, असं राहुल नार्वेकर यांनी सांगितलं.
शिवसेनेने नियम 3 अन्वये सभापतींना कोणतीही घटना सादर केलेली नाही, त्यामुळे मी मानतो की निवडणूक आयोगाने दिलेली शिवसेनेची घटना ही निर्धारासाठी खरी घटना आहे, असं विधानसभा अध्यक्ष त्यांच्या निकालात म्हणाले.
यावरून असा अर्थ काढला जातो आहे की, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंना उद्धव ठाकरेंनी कोणततीही निवडणूक न घेता केवळ मुलगा म्हणून वशिल्याने शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेवर घेऊन नेतेपद देण्यात आले. अजूनही निकालाचे वाचन सुरू असून याबाबत प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटवर भेट देत राहा.
तसेच, शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे गटनेते असलेल्या एकनाथ शिंदे यांना हटवू शकत नाही,कारण ते लोकशाहीला अनुसरून नाही असेही, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.