Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावपुणेमहाराष्ट्रमुंबई

सर्व कोचिंग (खाजगी शिकवणी संस्‍था-केंद्र) सेंटर्सना ग्राहक संरक्षण कायद्याचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश

नवी दिल्‍ली,दि-१८/०४/२५,”कोचिंग (खाजगी शिकवणी संस्‍था-केंद्र) क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध 2024 अंतर्गत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने सर्व कोचिंग सेंटर्सना ग्राहक संरक्षण कायदा 2019 चे आणि त्यातील मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.
कोचिंग सेंटर्सचे प्रतिनिधित्व अचूक, स्पष्ट असावे त्याचप्रमाणे  दिशाभूल करणारे दावे किंवा ग्राहकांकडून महत्त्वाची माहिती लपवता कामा नये, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. तसेच कोचिंग सेंटर्सनी हमखास यशाची खात्री देणे टाळावे. कोचिंग सेंटर्सनी त्यांच्या जाहिरातींमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, श्रेणी आणि अभ्यासक्रमाचे तपशील लिहिणे  तसेच त्या अभ्यासक्रमासाठी शुल्क भरल्याचा स्पष्ट उल्लेख यांसह इतर महत्त्वाचा तपशील द्यायलाच हवा. त्यासोबतच, जर एखादे अस्वीकरण लिहायचे असेल तर ते इतर महत्त्वाची माहिती लिहिलेल्या अक्षरांच्या आकारातच लिहावे लागेल जेणेकरून बारीक अक्षरातील मजकुरामुळे ग्राहकांची फसवणूक होणार नाही.
आयआयटी-जेईई आणि नीट सारख्या परीक्षांच्या अलीकडेच जाहीर झालेल्या निकालांच्या पार्श्वभूमीवर सीसीपीएने असे निरीक्षण नोंदवले आहे की कोचिंग सेंटर्स कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्व,2024 चे पालन करत नाही.
हा कायदा आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीसीपीए ने अलीकडेच काही कोचिंग संस्थांना खालील कारणांवरून नोटिसा बजावल्या आहे:
1)खात्रीपूर्वक प्रवेश,
2) खात्रीशीर निवड
3)जेईई/नीटमध्ये रँकची खात्री
4)ग्राहक हक्कांचे उल्लंघन
5)दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि फसव्या/अयोग्य पद्धतींचा अवलंब ज्यामध्ये सेवा न पुरवणे,
6) प्रवेश रद्द करणे मात्र शुल्काचा परतावा न करणे, सेवांमध्ये त्रुटी, शुल्काचा आंशिक/अनावश्यक परतावा.
वरील दावे आणि पद्धती ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या कलम- 2(28)) आणि 2 (47 आणि कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रतिबंधक मार्गदर्शक तत्त्वे, 2024 यासह कायद्याच्या विविध तरतुदींचे उल्लंघन करत असल्याचे दिसून येते. कोचिंग क्षेत्रातील दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यासाठी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने 13 नोव्हेंबर 2024 रोजी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या मार्गदर्शक तत्वांनुसार कोचिंग सेंटर्सना त्यांच्या सेवांचा प्रचार करण्यासाठी खोटे किंवा दिशाभूल करणारे दावे/ जाहिराती करण्यापासून तसेच फसव्या किंवा अनुचित पद्धतींमध्ये सहभागी होण्यापासून प्रतिबंधित केले आहे.
हा कायदा आणि मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीसीपीए ने अलीकडेच काही कोचिंग संस्थांना खालील कारणांवरून नोटिसा बजावल्या आहेत:नुकसान होऊ नये यासाठी टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या क्षेत्रात पारदर्शकता आणि निष्पक्षता वाढीस लागावी,  विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांना अचूक आणि सत्य माहितीच्या आधारे योग्य निर्णय घेता यावा या उद्देशाने ही मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. ही मार्गदर्शक तत्त्वे विद्यमान नियमांना पूरक आहेत आणि कोचिंग क्षेत्रातील जाहिरातींचे नियमन करणारी नियामक चौकट आणखी मजबूत करतात.
दरम्यान, ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि कोचिंग क्षेत्रात पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी, सीसीपीएने गेल्या तीन वर्षांत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, अनुचित व्यापार पद्धती आणि कोचिंग सेंटर्सकडून ग्राहक हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे.
या संदर्भात, सीसीपीएने 49 नोटिसा जारी केल्या आहेत, 24 कोचिंग सेंटर्सना एकूण 77.60 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे आणि त्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि अनुचित व्यापार पद्धती बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
सीसीपीएने यापूर्वी यूपीएससी, सीएसई, आयआयटी-जेईई, नीट, आरबीआय, नाबार्ड यासारख्या स्पर्धा परीक्षांसाठी सेवा देणाऱ्या कोचिंग सेंटर्सवर कारवाई केली होती,  ग्राहक संरक्षण कायदा, 2019 चे उल्लंघन करून कोणत्याही खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिराती केल्या जाणार नाहीत याची खात्री करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा एकदा दर्शवली होती.
 

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button