भुसावळसह इतर नगरपरिषदांच्या नगरसेवकांची संख्या वाढली,आकडेवारी घोषित, सोडतीद्वारे लवकरच प्रभाग रचना होणार घोषित

जळगाव – जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेले असून आज नुकतेच महाराष्ट्र शासनाचे राजपत्र घोषित केलेले आहे. त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका नगरपंचायतींचे ओबीसी इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती व महिला राखीव कोट्यातील निवडून देण्यासाठी नगरपरिषदेच्या सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आता लवकरच याबाबतच्या सोडती घेण्यात येणार असून नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदांसाठी प्रभाग रचना लवकरच जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीस अनुसरून, संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेची उपलब्ध असलेली लोकसंख्या विचारात घेऊन (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह ) पुढील तक्त्यात जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपरिषद आणि 2 नगरपंचायतसाठी एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.त्याचप्रमाणे स्त्री सदस्याची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह ) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या निश्चित करण्यात येत आहे.संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांच्याकडील आदेश पत्र क्रमांक नपसु/२००१/प्र.क्र. १/२००१/५, दिनांक १ जानेवारी २००१ अन्वये दिलेल्या अधिकारान्वये आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२५/प्र.क्र. ०५/का-६, दिनांक १६ जून २०२५ अन्वये आणि आयुक्त तथा संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नवी मुंबई यांच्याकडील आदेश क्रमांक नपप्रसं/ सार्वत्रिक निवडणूक / २०२५-२६ / का- ६/४६९२, दिनांक १६ जून २०२५ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात येत आहे.
भुसावळातील नगरसेवकांची संख्या वाढली
भुसावळ नगरपरिषद ही उत्तर महाराष्ट्रातील एकमेव अ वर्ग नगरपालिका असून त्यांच्या निवडून येणाऱ्या नगरसेवक सदस्यांची संख्या आता 50 झालेली असून 25 टक्के महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. इतरही परिषदांच्या सदस्यांची संख्या आता खालीलप्रमाणे वाढलेली आहे.














