Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
आरोग्यकृषीजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

इंदोर-हैदराबाद हायवेवरील पुलाच्या कामासाठी नदीत पुन्हा टाकला मुरूम ! पुर्णानदीच्या पाणलोट क्षेत्रातील गावांना महापुराचा धोका

नदीकाठच्या शेतीला पुराचा धोका

जळगाव ,दि-२३/०५/२५, मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा गावाजवळील इंदोर हैदराबाद जोडमहामार्ग क्रमांक एनएच ७५३ L दरम्यान पूर्णा नदीवर गेल्या काही सात आठ महिन्यांपासून २१०+९२० मीटर लांबीच्या मोठ्या पुलाचे बांधकाम सुरू होते. मात्र बांधकाम करताना पूर्णा नदीत बांधकाम सुरू करण्याआधी या महामार्गाचे कंत्राटदार बी. एन. अग्रवाल यांनी पाटबंधारे विभागाची कोणतीही पूर्व परवानगी न घेता, मनमानी पद्धतीने शेकडो डंपर भरून डबर व मुरमाचा भराव टाकून काम सुरू केलेले होते. हतनूर धरणात आधीच ५३% गाळ असून तो काढण्यासाठी गेला कित्येक वर्षांपासून प्रयत्न सुरू असताना तो गाळ काढण्याचे सर्व प्रयत्न शासन दरबारी आधीच निष्फळ ठरलेले असताना एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणावर पूर्ण नदीत भराव टाकल्याने, गाळाच्या प्रमाणात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहेच. तसेच हतनूर धरणावरून अनेक घरगुती व औद्योगिक वापराबाबतच्या अनेक योजना मंजूर आहेत. सदरील मुरूमाच्या भरावामुळे पाणीटंचाईचा व पूर फुगवट्याचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. याबाबत “मीडिया मेल” न्यूज ने यापूर्वीच दोन वेळा याबाबतचे वृत्त प्रकाशित केलेले होते. याप्रकरणी संबंधित जळगाव पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता अदिती कुलकर्णी यांनी याबाबत कंत्राटदार बीएन अग्रवाल यांनी कोणतीही पूर्व परवानगी घेतली नसल्याचे डिसेंबर महिन्यात सांगितलेले होते. यानंतर त्यांचे कनिष्ठ अधिकारी उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, सावदा यांनी दिनांक २१/१२/२०१४ रोजी क्षेत्रीय भेट दिली. सदर कामाच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, खंडवा अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग NH ७५३ L चे शहापूर बायपास ते मुक्ताईनगर सेक्शन च्या किमी १८०.००० ते २१६.२७८ चे मध्य प्रदेश / महाराष्ट्र राज्यात भारतमाला परियोजने अंतर्गत Hybrid Annity Mode वर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदर कामांतर्गत राष्ट्रीय महामार्गाचे किमी २१० +९२० येथे मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. सदर पुलाच्या कामासाठी हतनूर धरणाच्या जलाशयात पूर्णा नदीपात्रात मुरमाचा भराव करण्यात आलेला असून सदर कामाच्या ठिकाणी पूर्णा नदीच्या पात्रात मध्यभागी 8 ते 10 फुटांचे अंतर सोडून मुरमाचा भराव करण्यात येत आल्याचे क्षेत्रीय पाहणी दरम्यान उपविभागीय अधिकारी, सावदा यांच्या निदर्शनास आले.  सदर कामाचा पुलाच्या कामासाठी हतनूर जलाशयात करण्यात येत असलेल्या भरावा करीता हतनूर धरणाशी संबंधीत जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत जळगांव पाटबंधारे विभाग,जळगांवशी अथवा विभागांतर्गतच्या क्षेत्रीय कार्यालयाशी कोणत्याही लेखी संपर्क करून कामास कोणतीही ना हरकत प्रमाणपत्र अथवा परवानगी घेण्यात आली नसल्याचे संबंधित कंत्राटदराच्या प्रतिनिधीस समक्ष अवगत करण्यात आले आहे.
आतापर्यंत पाटबंधारे विभागाकडून तीन नोटीस बजावल्या आहेत,तरीही ठेकेदाराची मुजोरी कायम
दिनांक ०३/०१/२०२५ ,२७/०३/२५ आणि २७/०५/२०२५ रोजी तिसऱ्यांदा प्रकल्प संचालक ,राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण ,खंडवा, मध्यप्रदेश यांना कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग यांच्याकडून नोटीस बजावण्यात  आलेल्या असून, त्याची प्रत जिल्हाधिकारी जळगाव आणि मुक्ताईनगर तहसीलदार यांना सुद्धा देण्यात आलेली आहे. या महामार्गाच्या बाधित शेतकऱ्यांनी त्यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भूसंपादन मोबदला मिळणेबाबत गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सुरू असून आज मुक्ताईनगर पोलिसांनी संबंधित शेतकरी आंदोलकाना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले होते. त्यानंतर लागलीच ठेकेदाराने कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग यांच्या नोटीसीला न जुमानता या ठिकाणी महामार्गाचे व पुलाचे काम सुरू केलेले आहे.
पाणलोटा क्षेत्रातील गावांना धोका
पूर्णा नदीच्या पाणलोट क्षेत्रातील गावे, विशेषतः नदीकाठावरील किंवा खालच्या भागातील गावे, पूरग्रस्त असण्याची शक्यता आहे. पुर्णानदीच्या पूर्वेकडील खामखेडा, कुंड ,सुकळी ,वढोदा, पिंप्राळा, मुक्ताईनगर, अशा अनेक गावांना पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास महापुराचा धोका आता निर्माण झालेला आहे.
वाळूची रॉयल्टी भरली नसल्याचे उघड
पुर्णानदीवरील पुलाच्या पिलरच्या बांधकामासाठी मध्यप्रदेशातील शहापूर येथून वाळू उचलण्यात आलेली असून मात्र त्याबाबतची रॉयल्टी महाराष्ट्र शासनाला देण्यात आलेली नाही. महाखनिजपोर्टलवर सुद्धा संबंधित वाळू खरेदीची व वाहतुकीची नोंद दिसून येत नसल्याने, याबाबत महसूल विभाग कानाडोळा व डोळेझाक करत असून काहीच कार्यवाही करत नसल्याने, महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असून शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या रॉयल्टीच्या वसुलीचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button