भुसावळात बालकामगाराचा मद्यविक्रीसाठी वापर केल्याने वाईन शॉपचा परवाना रद्द होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल
भुसावळ दि-14/10/2024 भुसावळ शहरातील जामनेर रोडवर मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मधुर वाईन शॉप मध्ये काही महिन्यापासून एक अल्पवयीन मुलगा देशी विदेशी मद्याच्या बाटल्या ग्राहकांना विक्री आणि वाटप करण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे. दारूच्या दुकानात अल्पवयीन मुलाला कामगार म्हणून कामावर ठेवणे हा बालकामगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा आहे. त्यामुळे सदरील वाईन शॉप दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा. अशी मागणी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अल्पवयीन मुलांना कामावर ठेवून त्यांची पिळवणूक करणे हा कायद्याने गुन्हा असताना देखील भुसावळ शहरातील जामनेर रोडवर असलेल्या मधुर वाईन शॉप मध्ये एक अल्पवयीन मुलगा देशी विदेशी दारूची विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाईन शॉप मध्ये अल्पवयीन मुलांना कामगार म्हणून काम करण्यास बालप्रतिबंधक कायद्यान्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे.तरी देखील मधुर वाइन शॉपचे मालक शासनाच्या नियमांचे व कायद्याचे उल्लंघन करून कमी पगारावर अल्पवयीन मुला कडून देशी विदेशी दारू विक्री आणि वाटप करण्याचे काम करून घेत आहे. मधुर वाईन शॉपच्या मालकावर नियमोचित कायदेशीर कारवाई करण्यात यावी व त्यांच्या दुकानाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी सामाजिक तथा माहितीचा अधिकार कार्यकर्ते केदारनाथ वामन सानप यांनी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे लेखी अर्जाद्वारे केली आहे. भुसावळ विभागीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती नसावी का ? हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
याबाबतची प्रत जळगाव जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांना देखील पाठवली असल्याचे केदारनाथ सानप यांनी सांगितले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मधुर वाईन शॉपच्या मालकावर कायदेशीर कारवाई करती काय याकडे भुसावळकरांचे लक्ष केंद्रित झाले आहे.