जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

एकनाथराव खडसे अपक्ष लढणार की ‘तुतारी’ फुंकणार ? विरोधी उमेदवार बघून ठरवणार रणनीती ?

पुरस्कृत अपक्ष उमेदवारी लक्ष्यवेधी ठरणार

जळगाव दि-६ मार्च, गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्र हे लोकसभा निवडणूक जाहीर झालेली नसताना अजून बिगुल वाजले बाकी असताना लोकसभा निवडणुकांच्या उत्साहात ढवळून निघालेले असून लोकसभा निवडणुकांचे डोहाळे लागल्याचा आनंद भावी खासदारांना लागलेला आहे. भाजपसह राज्यातील सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे नेते हे आता टिव्हीवर तथा मेनस्ट्रीम मीडियावर दिवसभर ‘लाईव्ह’ दिसत असल्याने महाराष्ट्राच्या जनतेचे प्रचंड राजकीय मनोरंजन होताना दिसत आहे. विशेषतः टीव्ही बघण्यास वेळ नसलेले लोक आपल्या हातातील स्मार्ट फोनमधील युट्युबवर सर्वच प्रमुख नेत्यांना भाषणांमध्ये आश्वासने देताना बघत आहे.
दरम्यान, कालच जळगावात भाजपचे शक्तिशाली नेते गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा हे जळगाव दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांचेसह त्यांच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका करून राजकीय वातावरण तापविण्यात आघाडी घेतलेली दिसून येत आहे. त्यातच विविध सर्वे एजन्सी व न्यूज चैनल मार्फत गेल्या काही महिन्यांपासून येणारे वेगवेगळे सर्वे हे जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा या महायुतीच जिंकणार असल्याचे भाकीत ओपिनियन पोल मध्ये दिसून येत आहे.
दरम्यान, एवढं सगळं राजकीय वातावरण तापलेला असताना एकेकाळी महाराष्ट्र गाजवणारे आणि रावेर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करणारे उत्तर महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे मात्र सध्या काहीसे शांत व संयमी बसलेले दिसून येत असून ते योग्य क्षणाची वाट बघत असल्याचे दिसत आहे.
त्याला कारणही तसेच असून महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात असल्याने त्यांच्या ‘तुतारी’ या चिन्हावर निवडणूक लढावी की महाविकास आघाडी ‘पुरस्कृत’ अपक्ष लढवावी याची ते कदाचित रणनीती बनवत असावे, असा कयास बांधला जात आहे. त्यातच त्यांच्या सून आणि भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट भाजपकडून यावेळी कापले जाण्याची शक्यताही वर्तवली जात असल्याने ते कदाचित विशिष्ट समीकरणे आखणार असल्याचे बोलले जात आहे.
अपक्ष लढल्यास फायदाच होईल ?
एकनाथराव खडसे हे महाविकास आघाडी कडून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाच्या तुतारी या चिन्हावर लढल्यास त्यांच्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नक्कीच त्यांच्या मताधिक्यात घट होऊ शकते असा कयास राजकीय तज्ज्ञांतर्फे लावला जात आहे. स्वतः एकनाथराव खडसे हे अनुभवी आणि मुरब्बी राजकारणी असल्याने त्यांना राजकीय हवा कोणत्या दिशेने चाललेली आहे हे नक्कीच कळते. तसेच रावेर लोकसभा क्षेत्रातील कानाकोपऱ्यातील जातीय समीकरणे ,हिंदुत्ववादी मते, लेवा पाटीदार , मराठा व मुस्लिम मतदार यांच्या मतांच्या गोळाबेरीजेचा अभ्यास नक्कीच केला असेल आणि ग्राउंड रियालिटी बघून त्यांना मताधिक्य कसे वाढवता येईल याची सुद्धा सखोल जाण आहे. त्यामुळे ते सर्वच अंदाजांची चाचपणी करीत असावेत असे बोलले जात आहे. सध्या खडसे हे नफ्यातोट्याची गणितं बांधण्यात व्यस्त असल्याने अजून तरी त्यांनी त्यांचे पत्ते उघड केलेले नाही. मात्र अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्यास त्यांना महाविकास आघाडीच्या ‘अँटी इन्कमबन्सीचा’ नक्कीच फायदा मिळू शकतो.तसेच लेवा पाटीदार बहुल मतदार,दलित व अल्पसंख्याक मते यांचा त्यांना नक्कीच फायदा होईल असे अंदाज बांधले जात आहेत. त्यामुळे भाजपच्या लेवा पाटीदार उमेदवाराला सुद्धा ते नक्कीच जोरदार टक्कर देऊ शकतात. आज महाविकास आघाडीच्या राज्यभरातील सर्वच लोकसभा उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून एकनाथराव खडसेंच्या निर्णयाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. कारण एकनाथराव खडसेंची लढत ही राज्यातील प्रमुख लढतींपैकी एक लढत असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष रावेर लोकसभेकडे लागून असणार आहे. खडसे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवून जिंकल्यास भविष्यात ते भाजपशी हातमिळवणी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button