कीटकनाशक द्रव्य प्राशन करून विद्यमान खासदाराची आत्महत्या, देशाच्या राजकारणात मोठी खळबळ
मुंबई ,दिनांक -28 मार्च, सध्या देशभरात लोकसभा निवडणुकांची प्रचंड रणधुमाळी गाजत असताना एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे. एका राजकीय पक्षाच्या खासदारांनी विषारी किटकनाशक द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्याने देशातील राजकारणात प्रचंड खळबड उडालेली आहे. तुमचा विश्वास बसत नाही आहे ना, मात्र ही सत्य घटना तमिळनाडू राज्यातील इरोडला घडलेली आहे.
तमिळनाडूतील इरोड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार ए.गणेश मूर्ती यांनी 24 तारखेला कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचा या ‘कार्डीयाक अरेस्ट’ ने मृत्यु झालेला आहे. काल सकाळी पाच वाजता मृत्यू झालेला आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंबंधीचे वृत्त प्रकाशित केलेले आहे.
ए. गणेश मूर्ती हे 2019 साली मालूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात (एमडीएमके) या राजकीय पक्षाकडून लोकसभेवर निवडून गेलेले होते.
चक्क एखाद्या खासदाराने आत्महत्या करण्याची ही अलीकडच्या काळातील धक्कादायक गोष्ट मानली जात आहे.