गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणाऱ्या स्पीड बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटीची धडक, अपघातात 13 ठार
मुंबई दिनांक-१८/१२/२४, गेटवे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणाऱ्या प्रवाशी बोटीला इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने मोठा समुद्री अपघात घडलेला आहे. त्यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ नौदलाचे कर्मचारी आहे. तर १०१ लोकांना सुखरूप बचावले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनात दिली. या घटनेत मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत देण्याची घोषणाही फडणवीस यांनी केली. तर 77 जणांना वाचवण्यात यश आलं. नीलकमल नावाच्या स्पीड बोटवरून 80 प्रवाशी एलिफंटाकडे जात होते. त्यावेळी उरण, कारंजाजवळ ही दुर्घटना घडली.
या स्पीड बोटीने आधी एक मोठा राऊंड मारला आणि नंतर तिने नीलकमल या बोटीला समोरून धडक दिली. या जोरदार धडकेत नीलकमल बोट बुडाली. अपघातावेळी बोटीमध्ये 80 प्रवासी आणि 5 बोटीचे सदस्य होते. नेव्हीच्या स्पीड बोटीचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचं सांगण्यात येतंय. दुपारी 4 वाजण्याच्या सुमाराला हा अपघात घडला.
या अपघातात वाचवण्यात आलेल्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, नीलकमल बोट जवळपास 10 किमी समुद्रात गेल्यांनंतर समोरून आलेल्या एका स्पीड बोटीने त्याला धडक दिली. नीलकमल बोटीमध्ये पाणी यायला सुरुवात झाली. त्यानंतर सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेट घालायला सांगितलं. पण तोपर्यंत बोट पाण्यात बुडाली होती. मी जवळपास 15 मिनिटं पाण्यामध्ये पोहोत होतो. धडक दिलेल्या स्पीड बोटीमध्ये 8 ते 10 लोक होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, इंडियन नेव्हीच्या स्पीड बोटीचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे. यामध्ये तीन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ज्यांना वाचवलं आहे त्यांच्यावर तात्काळ उपचार करण्यात येतील. तर मृतांच्या कुटुंबीयांसाठी राज्य सरकारकडून योग्य ती मदत दिली जाईल.