पुणेमहाराष्ट्रमुंबईराजकीय

घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील-नितीन गडकरी 

Nitin gadkari | पुणे ,दि- 21/09/2024 आपल्या रोखठोक वक्तृत्वाने परखड मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेले नेते नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकारणातील घराणेशाहीवर जोरदार टीका केली आहे. लोकशाहीत सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीने लोकांची प्रखर टीका सहन करावी असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज मांडलेले आहे.राजाविरूद्ध कितीही बोललं तरी ते राजाने सहन करावं असं गडकरी म्हणाले. राजाने प्रखर टीकेवर चिंतन करावं, टीका सहन करणं ही राजाची सर्वात मोठी परीक्षा असते असं गडकरी म्हणाले. साहित्यिक,विचारवंतांनीही परखडपणे विचार मांडावे असं गडकरी म्हणाले. विश्वगुरु व्हायचं तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असाही सल्ला गडकरींनी दिला आहे. पुढे नितीन गडकरी म्हणाले की, आपल्या लोकशाहीमध्ये साहित्यिकांबद्दल,कवीबद्दल,विचारवंतांकडून तरी अपेक्षा आहे की त्यांनी आपले विचार परखड पणे मांडले पाहिजेत.
दरम्यान,पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा कोणती असेल तर राजाच्या विरोधात कितीही कोणीही परखडपणे  विचार मांडले तरी ते राजाने सहन केले पाहिजे आणि त्या विचारावर चिंतन केले पाहिजे हीच खरी लोकशाही मधील अपेक्षा असते.आई मला नेहमी सांगायची लहानपणी निंदकाचे घर असावे शेजारी आपल्याला दिशा देणारा माणूस जो आहे तो आपल्याला सांगणार आहे आपले काय चुकलं काय बरोबर आहे.

महाराष्ट्र संतांची भूमी आहे.  महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. प्रत्येक व्यक्तीकडून जे चांगला आहे ते आपण घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती की, त्यांनी अनेक वेळा विजय मिळवल्यानंतर कधीही परधर्मीयांची पूजा, मंदिर उद्ध्वस्त केली नाहीत. विरोधी असणाऱ्या स्त्रियांचा सन्मान केला त्यांना घरी पाठवलं.  एका अर्थाने त्यांनी आदर्श राजाचा परिचय करून दिला.  सर्वधर्मसमभावाच जुन्या इतिहासातील सगळ्यात चांगलं उदाहरण कुठल असेल छत्रपती शिवाजी महाराज आहे याचा मला विश्वास आहे, असेही नितीन गडकरी म्हटलेलं आहे.

घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील :  नितीन गडकरी 

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर रोखठोक भाष्य करत जनतेने अशा लोकांना मतदान करू नये असे वक्तव्य केले. गडकरी म्हणाले,  घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील.  राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा किंवा बायकोला तिकीट द्या असा काही राजकारणी आग्रह धरतात.  जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळे अशा गोष्टी अजूनही सुरू आहेत. ज्या दिवशी जनता ठरवेल की वारसा हक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही. तेव्हा ते लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा मुलगी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही. मात्र त्याने स्वतःची क्षमता सिद्ध केली पाहिजे व लोकांनी त्याला निवडणुकीत स्वबळावर उभे करा असे म्हटले पाहिजे असे रोखठोक मत नितीन गडकरी यांनी मांडलेलं आहे.  

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button