‘छावा’ बघून बऱ्हाणपूर जवळील असीरगडमध्ये खजिना शोधण्यासाठी लोकांची मेटल डिटेक्टरसह जोरदार शोधमोहीम
इंदौर हैदराबाद महामार्गाचे काम करताना काहींना सापडली होती नाणी

बुरहानपूर (असिरगड)दि-०८/०३/२५, नुकताच प्रदर्शित झालेला ‘छावा’ चित्रपट पाहिल्यानंतर मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील असीरगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील शेतात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली आहे. या अफवेनंतर येथील शेकडो लोक मशाल आणि आधुनिक मेटल डिटेक्टरसह इतर उपकरणे घेऊन शेतात खोदण्यासाठी रात्री शेतात पोहोचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वीही याच परिसरात अशी नाणी सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या, मात्र प्रशासनाच्या कठोरतेनंतर उत्खनन थांबले होते. आता अफवांचे पीक आल्यानंतर लोक पुन्हा शेतात खोदकाम करत आहेत.
ऐतिहासिक खजिन्याचा दावा
बुऱ्हानपूर मुघलांची एकेकाळी राजधानी होती. जवळच असलेल्या असीरगड किल्ल्यासह जवळपासच्या जमिनींमध्ये ऐतिहासिक खजिना दडला असल्याची स्थानिक लोकांची धारणा आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, लोक लांबून खोदण्यासाठी येत होते आणि काहींच्या हाती आधुनिक उपकरणेही होती. असे मानले जाते की प्राचीन काळी सैनिक आणि लोक त्यांच्या मौल्यवान वस्तू जमिनीत गाडत असत. इंदोर हैदराबाद महामार्गाच्या चौपदरीकरणा दरम्यान रस्ता तयार करताना काढलेली माती जवळच्या शेतात टाकण्यात आली, त्यानंतर काही मजूर महिलांना रस्त्याचे काम करताना सोन्याची नाणी सापडली होती. ही बातमी वाऱ्यासारखी परिसरात पसरतात शेकडो लोकांकडून रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडात खोदकाम सुरू करण्यात आले होते.असीरगड गावात पसरलेल्या या अफवेमुळे खजिन्याच्या शोधात लोकांना रात्रभर खोदकाम करावे लागले. याआधीही याच परिसरात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या. शेकडो लोक रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडात खोदताना दिसतात. यामध्ये महिला, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे.
रात्री लोक आले होते
एका प्रत्यक्षदर्शीने पत्रकारांना सांगितले की, आमच्या भागातील धुलकोट व झिरी येथील लोकही नाणी शोधण्यासाठी बुधवार आणि गुरुवारी मध्यरात्री असीरगडच्या शेतात पोहोचले होते. यावेळी मला या प्रकरणातील वास्तवही कळले. यापूर्वी मी लोकांकडून ऐकले होते की या भागात सोन्याची नाणी सापडत आहेत. आणि काही लोकांनी मला पितळेच्या नाण्यांबद्दल देखील सांगितले ज्यावर उर्दू आणि अरबी भाषेत काहीतरी लिहिलेले आहे, जे मुघल काळातील असल्याचे समजते. याची शहानिशा करण्यासाठी मी रात्री शेतात पोहोचलो तेव्हा शेकडो स्त्री-पुरुष टॉर्चच्या उजेडात नाणी शोधताना दिसले.
येथे मुघल सैनिकांची छावणी होती
ते म्हणाले की, मी वडिलांकडून ऐकले आहे की असीरगड हे ऐतिहासिक शहर होते, त्याची लोकसंख्या 7 लाख ते 8 लाख होती. आणि जवळच एक गाव आहे, सराई, इथे लष्करी छावण्या आणि घोड्यांचे तबेले होते. जेव्हा सैनिक आणि सुभेदार युद्धानंतर परत आले, तेव्हा ते बहुतेकदा लुटलेला माल शेतात लपवून ठेवत किंवा जमिनीत खड्डे खोदून ठेवत. लोक लूटमारीच्या भीतीने जमिनीत खड्डा खणून आपला खजिना लपवून ठेवत होते जेणेकरून तो सुरक्षित राहील. यामुळे लोकांना यापूर्वी अनेकदा सोन्याची नाणी मिळाली आहेत. आणि अजूनही भेटत आहेत.
महिलांना नाणी सापडली होती
काही दिवसांपूर्वी पितळ आणि सोन्याची नाणी काही मजूर महिलांना सापडली होती. या नाण्यांवर उर्दू आणि अरबी भाषेत काहीतरी लिहिले होते, त्यामुळे ही मुघलकालीन नाणी असावीत असा अंदाज वर्तवला जात आहे. यानंतर शेतात सोन्याची नाणी शोधण्याची प्रक्रिया सुरू झाली. हे सत्तेचे प्रमुख केंद्र राहिले आहे
जिल्हा पुरातत्व संघटनेचे सदस्य डॉ. मनोज अग्रवाल यांनी सांगितले की, असिरगढ परिसरात नाणी सापडतात कारण हा संपूर्ण परिसर त्यावेळी शक्तीचे एक मोठे केंद्र होते. येथे राजा आशा अहिर हे मेंढपाळांचे नेतेही होते. आणि इथे, शाहजहान , नादिरशाह, नासिर फारुकी आणि अकबर यांचेही या जागेवर वर्चस्व राहिले आहे. त्यावेळी बँका नसल्यामुळे जमिनीत खड्डा खणून खजिना लपविला होता. जुन्या काळातील नाणी इथे सापडतात पण ती फक्त सोन्याचीच आहेत का हा आता तपासाचा विषय आहे.