जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय
जळगाव मधून विद्यमान खासदार उन्मेश पाटलांचा पत्ता कट, यांना मिळाली भाजपची उमेदवारी
अमित शाह आले अन् पत्ता कट
जळगाव दि -१३ मार्च, भाजपने आज लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दुसरी यादी जाहीर केलेली असून या यादीत अनेक दिग्गजांची नावे आहेत. आज जाहीर झालेल्या यादीत काही खासदारांचा पत्ता कट झालेला असून यात जळगावचे विद्यमान खासदार उमेश पाटील यांचाही समावेश आहे. त्यांच्या ऐवजी माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आलेले असून खानदेशातून फक्त उमेश पाटील यांचा पत्ता कट झालेला असून बाकी भाजपचे विद्यमान खासदार यांना पुन्हा तिकीट मिळालेले आहे.