जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय
रक्षा खडसेंना मुक्ताईनगरातून मोठा लीड , रोहिणी खडसेंना विधानसभेसाठी धोक्याची घंटा, विधानसभानिहाय मिळालेला ‘लीड’
जळगाव- दिनांक 4 जून, रावेर लोकसभा मतदारसंघाची एकूण आकडेवारी आता समोर आलेले असून भाजपच्या उमेदवार रक्षा निखिल खडसे यांना विधानसभा मतदारसंघ निहाय मिळालेली मतांची आकडेवारी आता समोर आलेले आहे.
विधानसभा | रक्षा खडसे | श्रीराम द.पाटील | रक्षा खडसेंची आघाडी |
चोपडा | 117319 | 53677 | 63642 |
रावेर | 107427 | 71696 | 35731 |
भुसावळ | 95192 | 53732 | 41460 |
जामनेर | 105092 | 68412 | 47,580 |
मुक्ताईनगर | 102061 | 55132 | 46929 |
मलकापूर | 102467 | 55381 | 47086 |
भाजपच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार रक्षा निखिल खडसे यांना विधानसभा मतदारसंघ निहाय मिळालेली आघाडी वरील तक्त्यात नमूद केलेली आहे.मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून रक्षा खडसेंना 46929 मतांचे मताधिक्य मिळाल्याने तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या संभाव्य उमेदवार रोहिणी खडसे-खेवलकर यांचेसाठी डोकेदुखी ठरणार आहे.कारण शेवटच्या टप्प्यात प्रचार करून शिंदे गटाचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी महायुतीचा धर्म निभावल्या चे समोर आलेलं आहे.