बारामतीची जागाही जिंकून दाखवू ,लोकसभा निवडणुकीत आमचा स्ट्राईक रेट १०० टक्के असेल- मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा
बारामती दि:26 सप्टेंबर , उपमुख्यमंत्री अजित दादा आणि त्यांच्याबरोबरचे सर्व आमदार आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्रात कोणी म्हणते ४५, कोणी म्हणते ४६. मात्र, मी या आधीच सांगितले आहे की, ‘आऊट ऑफ’ बारामतीसह लोकसभेच्या ४८ जागा जिंकू आणि पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करू, असा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
बारामतीकरांचा माझ्या म्हणण्यावर किती विश्वास आहे माहिती नाही. मात्र, मी गेली ३० वर्षे आमदार आहे. मी जे बोलतो त्यात चुकीचं काही निघत नाही. आम्ही विरोधकांना ‘क्लीन बोल्ड’ करून लोकसभेच्या शंभर टक्के जागा निवडून आणण्याचा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीत व्यक्त केला.
पाच वर्षांपूर्वी जळगाव व धुळे महानगरपालिकांच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळविल्यानंतर मी म्हणालो होतो की, मी एक दिवस बारामती जिंकून दाखवीन आणि आता ती वेळ जवळ आलीयं असं विधान ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
धनगर आरक्षणासंदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे सुरू असलेल्या आंदोलन स्थळी मंत्री गिरीश महाजन आज भेट देणार आहे. गेल्या १८ दिवसांपासून चौंडी येथे आंदोलन सुरू आहे. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीतून सकारात्मक मार्ग निघाला आहे. आज उपोषणकर्त्यांना आम्ही भेटणार आहोत. त्यांच्याशी चर्चा करून मार्ग निघेल. उपोषण सुटेल असेही महाजन यावेळी म्हणाले.