निवडणूक आयोगाकडून निवडणूक रोख्यांची इत्यंभूत माहिती जाहीर, भाजपाला सर्वाधिक छप्परफाड देणगी
खालील pdf फाईल डाऊनलोड करून वाचावी
credit – Election Commission of India
सर्वोच न्यायालयाच्या आदेशानंतर एसबीआयने (भारतीय स्टेट बँक) निवडणूक रोख्यांविषयीची सर्व माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. त्यानुसार, १ एप्रिल २०१९ ते ११ एप्रिल २०१९ दरम्यान एसबीआयकडून ३,३४६ निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली. यापैकी १,६०९ रोखे वटवण्यात आले. तसेच १२ एप्रिल २०१९ ते १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत या पाच वर्षांच्या काळात १८,८७१ निवडणूक रोखे खरेदी केले गेले. तर याच काळात २०,४२१ रोखे वटवले गेले. भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडून एकूण २२,२१७ निवडणूक रोख्यांची खरेदी केली गेली आणि त्यापैकी २२,०३० रोखे वटवण्यात आले आहेत. दरम्यान कोणत्या कंपनीने निवडणूक रोख्यांची खरेदी केली? किती निवडणूक रोख्यांची किती रुपयांना खरेदी केली? तसेच हे निवडणूक रोखे कोणत्या पक्षाने वटवले याबाबतची माहिती देखील एसबीआयने निवडणूक आयोगाला दिली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक आयोगाने ही माहिती त्यांच्या अधिकृत सकेतस्थळावरून जाहीर केली आहे.
निवडणूक आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावरून जाहीर केलेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टीच्या नावे ८,६३३ नोंदी आहेत. म्हणजेच भाजपाला ८,६३३ निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मिळाले आहेत. तर काँग्रेसच्या नावे ३,१४५ नोंदी आहेत. यामध्ये देशभरातील बहुसंख्या पक्षांच्या नोंदी आहेत. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेच्या नावानेदेखील नोंदी आहेत.
निवडणूक आयोगाने अपलोड केलेल्या डेटानुसार, फ्युचर गेमिंगने 2019 पासून सर्वाधिक प्रत्येकी ₹1 कोटी किमतीचे 1,368 कोटी रोखे खरेदी केले आहे.
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांमध्ये ग्रासिम
इंडस्ट्रीज, मेघा इंजिनिअरिंग, पिरामल एंटरप्रायजेस यासारख्या मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे. या यादीत अपोलो टायर्स, लक्ष्मी मित्तल, एडलवाईस, केव्हेंटर, सुला वाईन, वेलस्पन, सन फार्मा यांसारख्या निवडक बाँड खरेदी करणाऱ्या कंपन्यांच्या नावांचाही समावेश आहे. राजकीय पक्षांना निधी पुरविणाऱ्यांचा यादीत टोरेंट पॉवर, भारती एअरटेल, डीएलएफ कमर्शियल डेव्हलपर्स, वेदांत लि. या कंपन्या देखील आघाडीवर आहेत. क्विक सप्लाय चेन प्रायव्हेट लि., हल्दिया एनर्जी लिमिटेड, वेदांत लिमिटेड,
एस्सेल मायनिंग अँड इंड्स लिमिटेड,वेस्टर्न यूपी पॉवर ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, केव्हेंटर्स फूडपार्ट इन्फ्रा लिमिटेड, मदनलाल लिमिटेड, आणि भारती एअरटेल लिमिटेड हे SBI निवडणूक रोख्यांच्या यादीतील शीर्ष 10 देणगीदारांमध्ये होते. EC ने आज जाहीर केले.
खालील फाईल ओपन करून वाचा