पाकिस्तानच्या दुसऱ्या सर्वात मोठ्या नौदल एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला, ६ चिनी ठार
गेल्या आठवड्यात चीनच्या अधिपत्याखाती विकसित होणाऱ्या ग्वादर बंदर प्रकल्पावर झालेला दहशतवादी हल्ला ताजा असतानाच काल रात्री पुन्हा पाकिस्तानमधील दुसऱ्या क्रमाकांच्या सर्वात मोठ्या हवाई तळावर भयंकर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वामधील तुरबत शहरात असलेल्या पीएनएस सिद्दीकी या हवाई तळावर बॉम्बस्फोट आणि अंदाधुंद गोळीबार करण्यात आला आहे.
पाकिस्तानात सलग दुसरा मोठा आत्मघाती हल्ला झालेला आहे. या दहशतवादी हल्ल्यात 5 चिनी नागरिक असलेल्या अभियंत्यांचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती पोलिसांनी स्थानिक माध्यमांना दिली आहे.
या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) ने घेतली आहे. चीनची गुंतवणूक असल्याचा आरोप करत बीएलएने याठिकाणी हल्ला केला आहे. एवढेच नाही तर ज्याठिकाणी चीनच्या ड्रोन्सचा तळ होता, तिथेच हल्ला केल्याचा दावा बीएलएने केला आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने सहा हल्लेखोरांचा खात्मा केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यानंतर तुरबतमध्ये आपत्कालीन परिस्थितीची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान,बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार बीएलए संघटनेच्या माजीद ब्रिगेडने हा हल्ला घडवून आणलेला आहे.पाकिस्तानमधील डॉन या वर्तमानपत्राने तुरबतमधील मकरानचे आयुक्त सईद अहमद उमरानी यांच्या हवाल्याने या हल्ल्याची माहिती दिली आहे. उमरानी म्हणाले की, हवाई तळाच्या तीन बाजूंनी हल्लेखोरांनी जोरदार हल्ला केला. मात्र सुरक्षा दलांनी तात्काळ त्याल प्रत्युत्तर दिले. हवाई तळाच्या परिसरात येण्यापासून हल्लेखोरांना रोखण्यात यश मिळाले.