Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

भुसावळात 5 वर्षीय मुलीचे अपहरण करणारा आरोपी 24 तासांत जेरबंद करण्यात बाजारपेठ पोलिसांना यश ; मुलगी सुखरूप

भुसावळ, दि. 23 ऑक्टोबर 2025: भुसावळ शहरातील बस स्टँड रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ATC) समोर 22 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास 5 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध भा. द. वि. संहिता कलम 137(2) अंतर्गत गुन्हा (रजि. क्र. 491/2025) दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसांनी तातडीने तपास सुरू केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे अज्ञात आरोपी गोरेलाल भगवानसिंग कछवे उर्फ भिलाला (रा. अजदरा) याला बोदवड तालुक्यातील उजनी देवस्थान येथून 24 तासांत ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने मुलीचे भिक मागण्याच्या उद्देशाने अपहरण केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून मुलीला सुखरूप ताब्यात घेऊन फिर्यादीच्या स्वाधीन केले आहे.
आरोपीवर यापूर्वीही खरगोन (म.प्र.) येथील चैनपुर पोलीस ठाण्यात भा. द. वि. संहिता कलम 363 अंतर्गत (दि. 03/05/2022) गुन्हा दाखल आहे.
सदर कार्यवाही ही जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, नितीन गणापुरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, रवींद्र भावसार, पोलीस शिपाई योगेश माळी, प्रशांत सोनार, भूषण चौधरी, अमर अढाळे, जावेद शहा, हर्षल महाजन, जिवन कापडे, योगेश महाजन, सचिन चौधरी, महेंद्रसिंग पाटील, मोहसीन शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र नरवाडे, पोलीस हवालदार उमाकांत पाटील, अक्रम शेख, गोपाल गव्हाळे, विकास सातदिवे, पोलीस शिपाई प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, राहुल रगडे, उदय कापडणे, रवींद्र चौधरी, किशोर पाटील, नेत्रम कॅमेरा विभागाचे मुबारक देशमुख, पंकज राठोड आणि प्रणय पवार यांनी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि पोलीस हवालदार रमण सुरळकर हे करत आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp