Advertisement
क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

यावल तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत आदिवासींसोबत दिवाळी साजरी करणारे श्री गिरीश महाजन पहिले मंत्री

जळगाव, 22/10/2025 – महाराष्ट्राचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी यावल तालुक्यातील सातपुड्याच्या दुर्गम आदिवासी वाड्या-पाड्यांमध्ये जाऊन दिवाळीचा सोहळा साजरा केला. गतवर्षी पालघर जिल्ह्यातील आदिवासींसोबत दिवाळी साजरी करणारे महाजन हे यंदा यावल अभयारण्यातील गारखेडा, जामन्या, उसमळी आणि लंगड्या आंबा परिसरातील आदिवासींसोबत सहभागी झाले. ही त्यांची सलग दुसरी दिवाळी असा इतिहास घडवताना, मंत्री महाजन हे यावल तालुक्यातील सातपुड्याच्या अशा दुर्गम भागात दिवाळी साजरी करणारे राज्यातील पहिले मंत्री ठरले आहेत.


मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासींसोबत दिवाळीचा आनंद लुटला तसेच त्यांना मिठाईची भेट देऊन शुभेच्छा दिल्या. आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात महाजन आणि त्यांचा परिवारही सहभागी झाला. मंत्री महाजन यांनी ढोल वाजविण्याचा आनंद घेतला, तर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात सर्वांनी एकत्र येऊन मजा केली. या सोहळ्यामुळे आदिवासींची दिवाळी खऱ्या अर्थाने संस्मरणीय झाली.


मंत्री गिरीश महाजन म्हणाले, “आदिवासी बांधवांच्या सोबत दिवाळी साजरी करणे हा माझा वार्षिक सोहळा झाला आहे. त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होणे हे आमचे कर्तव्य आहे. सातपुड्याच्या या निसर्गसुंदर भागात येऊन त्यांच्याशी बोलणे, त्यांच्या समस्या ऐकणे हे माझ्यासाठी आनंदाचे क्षण आहेत.” या वेळी त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी विविध योजना आणि पाणीपुरवठा प्रकल्पांचीही माहिती दिली.
या उपक्रमामुळे स्थानिक आदिवासी समाजात उत्साहाचे वातावरण आहे. गतवर्षी पालघरमध्येही असाच उपक्रम राबवून मंत्री गिरीश महाजन यांनी आदिवासी विकासाकडे वळण दाखवले होते. यावल अभयारण्याच्या या दुर्गम भागात पोहोचणे हे खडतर असले तरी महाजन यांचा हा प्रयत्न आदिवासींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
याप्रसंगी मंत्री गिरीश महाजन यांच्या सोबत त्यांच्या पत्नी साधना महाजन,आमदार अमोल जावळे, डॉ सौ.केतकी पाटील, कृऊबा सभापती , संचालक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Check Also
Close
Back to top button
Join WhatsApp