Advertisement
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबई

प्रसुती रजेसाठी शिक्षिकेकडून ३६००० रू ची लाच घेताना मुख्याध्यापिकेसह क्लर्क अडकला, धुळे ACB घ्या जाळ्यात

भुसावळ दि-०७/०७/२५, जळगाव जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडलेली असून चक्क गर्भवती शिक्षिकेकडून ३६००० रूपयांची लाच घेताना गलेलठ्ठ पगार घेणारी मुख्याध्यापिका रंगेहाथ पकडली गेली आहे. अशा प्रवृत्तींनी लाच घेऊन शिक्षण क्षेत्राला बदनाम करण्याचे काम केले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , रावेर तालुक्यातील खिरोदा येथील धनाजी नाना विद्यालयात कार्यरत महिला उपशिक्षिकेची प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी 36 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (57, रा. चिनावल रोड, खिरोदा) तसेच कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (27, रा. उदळी, ता. रावेर) यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. आज सायंकाळी चार वाजता झालेल्या या कारवाईने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडालेली आहे.
लाच प्रकरणाची पार्श्वभूमी अशी
या प्रकरणातील 61 वर्षीय तक्रारदार सेवानिवृत्त मुख्याध्यापक असून ते याच संस्थेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तर त्यांच्या स्नुषा या याच शाळेत उपशिक्षिका आहेत. प्रसुती रजा मिळण्यासाठी त्यांनी 2 जून रोजी मुख्याध्यापिका यांच्याकडे अर्ज दिला व तक्रारदाराने सुनेच्या सांगण्यावरून महिला मुख्याध्यापिकेची भेट घेतल्यानंतर प्रसुती रजा मंजूर करण्यासाठी प्रती महिना पाच हजार प्रमाणे सहा महिन्यांचे 30 हजार रुपये मागण्यात आले. त्यानंतर तक्रार दिल्यानंतर  लाचेची रक्कम एकूण रक्कम सहा महिन्यांसाठी 36000 रुपये मागण्यात आली, त्यानंतर कनिष्ठ लिपिकाने लाच स्वीकारून ती रक्कम मोजत असताना मुख्याध्यापिकेलाही रंगेहाथ अटक करण्यात आली. यातील दोघांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आलेले असून त्यांच्या सहीने यापूर्वी मंजूर करण्यात आलेल्या इतरही वैद्यकीय देयकांची चौकशी सुरू झाली आहे. आज हा सापळा श्री.भारत सांगळे पोलिस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात त्यांच्याच पथकाने यशस्वी केला आहे. वरील मुख्याध्यापक आणि क्लर्क या दोघा आरोपींविरोधात सावदा पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button