Advertisement
क्राईम/कोर्टजळगावनिवडणूकमहाराष्ट्रमुंबई

भुसावळात दरोड्याच्या तयारीत असलेल्या आंतरराज्य गॅंगला पोलिसांनी पकडले, गावठी पिस्तूल,जिवंत काडतुसे,चॉपर जप्त

भुसावळ दि-२७/११/२५, नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरात विशेष पेट्रोलिंग करणाऱ्या भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने बुधवारी (दि. २६ नोव्हेंबर २०२५) रात्री ११.१० वाजता मोठी कारवाई करत मध्य प्रदेशातील हरदा जिल्ह्यातील आंतरराज्य सराईत दरोडेखोर टोळक्याला पकडले. तीन जणांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून एक गावठी पिस्तुल, मॅगझीनमध्ये भरलेली दोन जिवंत काडतुसे, चॉपर, मिरची स्प्रे, दोरखंड आणि तीन बिननंबर मोटारसायकल जप्त करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित पाच साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पकडलेले आरोपी
१) शुभम दुर्गाप्रसाद ओनकर (वय २४, रा. पोखरणी, ता. खिडकिया, जि. हरदा, म.प्र.)
२) मृत्युंजय उर्फ भोला सत्येंद्र कवीशेखर (वय ४३, रा. बंगाली कॉलनी, हरदा, म.प्र.)
३) राजू उर्फ शिवकुमार भगवानदास माणिक (वय १९, रा. मंगल बाजार, खिडकिया, हरदा, म.प्र.)
हे तिघे काळा हनुमान मंदिरासमोरील भाजी मार्केटजवळील आदर्श पॅकेजिंग दुकानाच्या मागे लपून बसले होते. पोलिसांना पाहताच ते पळू लागले, मात्र पोलिसांनी पाठलाग करून तिघांना घटनास्थळीच ताब्यात घेतले.
जप्त केलेले साहित्य :
१) गावठी पिस्तुल (किंमत अंदाजे ₹१५,०००) व त्यातील दोन जिवंत काडतुसे (प्रत्येकी ₹१०००)
२) १२ इंच लांब चॉपर (पाते ८ इंच)
३)मिरची स्प्रे, २० फूट लांबीचा दोर
४) तीन बिना नंबर मोटारसायकल (बजाज पल्सर – काळी व राखाडी, अपाची – लाल; एकूण किंमत अंदाजे ₹१.५० लाख)
५) दोन मोबाईल फोन
आरोपींच्या चौकशीत समोर आलेली धक्कादायक बाब आरोपींनी कबुली दिली की, भुसावळमधील बंटी परशुराम पथरोड, शिव पथरोड, अभिषेक जवाहरलाल गौर आणि तेजस चंद्रकांत टकले (दोन्ही रा. भुसावळ) यांनी त्यांना भुसावळ शहरातील सराफ बाजार व श्रीमंतांच्या बंगल्यांवर दरोडा टाकण्यासाठी पाचारण केले होते. स्थानिक आरोपींनी त्यांना टार्गेट दाखवले असून, बुधवारी रात्रीच दरोडा टाकण्याच्या तयारीत हे तिघे लपले होते.
पळालेले पाच साथीदार :
१) मयूर ओमप्रकाश टाक (रा. पोखरणी, हरदा)
२) आशिष चोटी
३) विरेंद्र कडोले उर्फ भय्यू येडा
४) हनी ठाकुर
५) एक अज्ञात
या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात पो.हे.कॉ. विजय नेरकर यांच्या फिर्यादीवरून भादंवि ३१०(४), ३१०(५), ६१(२), आर्म्स अॅक्ट ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पळालेले आरोपी व भुसावळमधील स्थानिक साथीदारांचा कसून शोध घेतला जात आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मंगेश जाधव व पथकाने केली.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Related Articles

Back to top button