मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गाडीचा भीषण अपघात
जळगाव: दिनांक:-१ एप्रिल, जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या चारचाकी गाडीचा भीषण अपघात होऊन त्यांच्यासह त्यांच्या सुरक्षा वाहनातील तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यात जुनाकुंड रस्त्यावर घडलेली आहे.
या घटनेत आमदार चंद्रकांत पाटील यांनी माहिती देताना म्हटलेलं आहे की, मुक्ताईनगर वरून आपण जुनाकुंड रस्त्याने जात असताना काही शेतकरी आपल्या साठी रस्त्यावर थांबून होते. त्यांना पाहून आपण आपली गाडी चालकास थांबविण्यास सांगितले.
आमची गाडी थांबताच मागून येणाऱ्या माझ्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीचां ब्रेक न लागल्याने ती गाडी आपल्या गाडीवर जोरदारपणे आदळली आहे.
यात आपल्याला ही दुखापत झालेली असून तशीच दुखापत सुरक्षा रक्षक असलेल्या तीन पोलिसांना सुद्धा झालेली आहे. मुक्ताईनगर येथील एका खासगी रुग्णालयायत आपण उपचार घेत असल्याचं मुक्ता नगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना म्हटलेल आहे.