जळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

एकनाथराव खडसेंबाबत मोठा खुलासा, रक्षाताई सध्या कुठे आहेत जाणून घ्या

जळगाव- दि: २ एप्रिल, काल परवा रात्रीपासून राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे हे त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्यांच्यासोबत रावेरच्या विद्यमान खासदार आणि त्यांच्या स्नुषा रक्षाताई खडसे या सुद्धा दिल्लीत दाखल झाल्याची चर्चा सोशल मीडियावर पसरलेली होती.यावर रक्षाताई खडसे यांनी यावर आपले मौन सोडलेले आहे.


रक्षाताई खडसे यांनी आज सांगितले आहे की, त्या त्यांच्या माहेरातील समारंभाच्या कार्यक्रमाला एका दिवसासाठी नंदुरबार येथे गेलेल्या होत्या, परंतु त्या काल रात्री पुन्हा परतलेल्या असून आज पासून पुन्हा रावेर लोकसभा क्षेत्रातील मतदारसंघातील भुसावळ तालुक्यातील ग्रामीण भागात प्रचारात सक्रिय आहे. आज भुसावळ विधानसभा मतदारसंघातील स्थानिक भाजपचे पदाधिकारी यांच्यासह विधानसभा मतदारसंघात घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदार संघ पिंजून काढलेला आहे.
यावेळी रक्षा खडसेंनी एकनाथ खडसे यांच्या बाबतीत मोठा खुलासा केलेला आहे. नाथाभाऊ दिल्लीत त्यांच्या खाजगी कामानिमित्त गेलेले असून त्यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात मला काहीही माहिती नाही. आणि आमच्या कुटुंबात देखील अशी कोणतीही चर्चा झालेली नाही, असा खुलासा रक्षा खडसे यांनी केलेला आहे.
तसेच त्यांनी स्थानिक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना उत्तर दिलेले असून त्यांनी असे म्हटलेलं आहे की, चंद्रकांत पाटील जे आरोप करत आहे की, मी मतदार संघात एक रुपयाचही काम केलेले नाही, तर रक्षा खडसेंनी केलेल्या विकास कामांच्या पुराव्या बद्दल सविस्तर सांगितलेले आहे. त्यांनी असे म्हटलेले आहे की, जामनेर- पाचोरा- बोदवड ब्रॉडगेज रेल्वे , मुक्ताईनगर शहरापासून तरसोद पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरणासह मजबूती करणं करणे. शेतकऱ्यांच्या पिक विमा संदर्भात लोकसभेत आवाज उठवून शेतकऱ्यांना पिक विम्याचा लाभ मिळवून देणे.हजारो लोकांना घरकुलांची प्रकरणे मंजूर करणे, याशिवाय केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत, जलयुक्त शिवार अशा कित्येक शेकडो विविध योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना विविध प्रकारच्या योजनांचा लाभ मिळवून दिलेला आहे,अशी प्रतिक्रिया रक्षाताई खडसे यांनी दिलेली आहे.

दरम्यान,सार्वत्रिक निवडणुक 2024 अनुषंगाने रावेर लोकसभा क्षेत्र भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रचारार्थ निवडणूक नियोजनासाठी आमदार श्री.संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाग्यलक्ष्मी लॉन, तळवेल येथे तळवेल-हतनूर जि.प.गट यांचा भाजपा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला असता,भाजपा पदाधिकारी यांनी स्थानिक सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख यांना मार्गदर्शन करून प्रधानमंत्री श्री.नरेंद्रजी मोदी सलग तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनविण्यासाठी तसेच महायुती उमेदवार खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी जोमाने कामाला लागून, आपल्या बुथवर जास्तीतजास्त मतदान भाजपाला मिळवून देण्याचे यावेळी आवाहन केले आहे.

यावेळी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे व आमदार श्री.संजयजी सावकारे यांच्यासह श्री.अजय भोळे, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री.मनोज बियाणी, रावेर लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.नंदकिशोर महाजन, जिल्हा सरचिटणीस श्री.परिक्षीत बऱ्हाटे, विधानसभा निवडणूक प्रमुख श्री.संजय पाटील, तालुकाध्यक्ष श्री.प्रशांत पाटील, कृषी उत्पन्न सभापती श्री.अनिल वारके, माजी सभापती सौ.वंदना उन्हाळे, श्री.राजेंद्र चौधरी, शेतकी संघाचे श्री.ज्ञानदेव झोपे, कृषी उत्पन्न उपसभापती श्री.प्रशांत निकम, माजी सभापती श्री.राजेंद्र चौधरी, माजी उपसभापती श्री.अरुण इंगळे, तालुका सरचिटणीस श्री.आकाश झांबरे व भाजपा तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button