मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा, भाजपचा गटनेता निवडीची प्रक्रिया रखडली, मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम
जळगाव,दि-26/11/2024, महाराष्ट्र विधानसभेचा आज कार्यकाल संपल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायद्यातील तरतुदीनुसार राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थिती आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केलेला आहे. राज्यपाल यांनी तो स्वीकार केला असून पुढील सरकार स्थापन होईपर्यंत एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील. राज्यात नुकत्याच लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार महायुतीला 232 जागांची घवघवीत यश मिळालेले असून सर्वाधिक 132 जागा या भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळालेल्या त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणार असून देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून सरकारमध्ये राहणार असल्याचीही चर्चा सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यात भाजपचे दहा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे सहा व अजित पवार राष्ट्रवादी गटाचे चार आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. पुढच्या 48 तासात राज्यात नवीन मुख्यमंत्री मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्या दृष्टीने आता हालचाली सुरू झालेले आहेत. राज्यात सर्वाधिक संख्याबळ हे भाजपचे असल्यामुळे राज्यपाल भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रित करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्याआधी भाजपला आपला गटनेता नेमून त्याबाबतच्या सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र राज्यपाल यांच्याकडे सादर करावे लागणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा निर्णय आता दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हेच येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे बोलले जात आहे.