
जळगाव, दि-04/05/2025, राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा शासकीय दौरा सोमवार, दिनांक ५ मे रोजी पुढील प्रमाणे घोषित करण्यात आलेला आहे.
उद्या सोमवारी दुपारी १२.३० वाजता वस्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे हे भुसावळ येथील त्यांच्या निवासस्थानावरून जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या महत्वपूर्ण बैठकीस ते उपस्थित राहून जिल्ह्यातील वस्त्रोद्योग विकासाबाबत आढावा घेतील.
टेक्सटाईल पार्क संदर्भात महत्वपूर्ण बैठक
जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या असलेल्या भुसावळ , चाळीसगाव आणि जामनेर येथील टेक्स्टाईल पार्क आणि त्यातून जिल्ह्यात निर्माण होणारे रोजगार, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार असून गेल्या मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या शंभर दिवसांच्या प्रशासन गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमात वस्त्रोद्योग मंत्रालयाला राष्ट्रीय गुणवत्ता परिषदेतर्फे 100 पैकी 100 गुण मिळालेले आहेत.
उद्या दुपारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत होणाऱ्या या बैठकीनंतर दुपारी ३.०० वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयातून शासकीय वाहनाने अहिल्यानगरकडे प्रयाण करतील.