मुंबई, दि- 14/08/2024, संपूर्ण राज्यात ई – पॉस मशिनच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वाटप केले जाते. गेल्या महिनाभरापासून ई पॉस मशिनबाबत तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यातील पात्र लाभार्थी अन्न धान्यापासून वंचित राहिलेले आहे. या तांत्रिक अडचणी लवकर दूर होण्याची शक्यता नसल्याने आता नागरिक संतापलेले आहेत. त्यामुळे ते धान्यापासून वंचित राहू नयेत यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट मधील अन्नधान्य वितरण ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता दिली आहे. ई-पॉस मशीनमध्ये लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. यासाठी रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसवण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरणामध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. या तांत्रिक समस्या एनआयसीकडील धान्य वितरण प्रणाली, क्लाऊड सर्व्हर यांच्याशी संबधित आहेत. या समस्या तात्काळ दूर करण्याच्या सूचना एनआयसी व क्लाऊड सर्व्हर सुविधा पुरवठादारांना शासनाकडून देण्यात आल्या आहे. ई-पॉस मशीनमध्ये आलेल्या अडचणींमुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना अन्नधान्याचा सुयोग्य पुरवठा व्हावा यासाठी अन्न नागरी पुरवठा विभागाने जुलै व ऑगस्ट 2024 या महिन्यांकरिता अन्नधान्याचे वितरण ऑफलाइन पद्धतीने करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयास आज दिलेल्या आहेत.
MAYURESH NIMBHORE
या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही.
लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात.
संपर्क -09820203031
Read Next
1 week ago
eps-95 च्या पेन्शनधारकांसाठी खुशखबर, येणाऱ्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडून 7500 मंजूर होण्याची शक्यता
1 week ago
पालकमंत्रीपदे रखडली, 26 जानेवारीचे ध्वजारोहण जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते होण्याची शक्यता, पालकमंत्री पदांची नियुक्ती ‘या’ दिवशी होण्याची शक्यता
2 weeks ago
भुसावळात भल्या पहाटे चहाचा घोट घेत असताना गोळीबार करून तरुणाची निर्घृण हत्या
2 weeks ago
खनिकर्म विभागातील सर्व कामात सुसूत्रता आणा, खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
2 weeks ago
वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते विशेष प्लॅटफॉर्मवर प्रवेश योग्यता सुनिश्चित करण्यासाठी पहिलेच उद्घाटन
2 weeks ago
राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर
Related Articles
‘सबका साथ सबका विकास’ यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुकांची गोची,उद्या मंत्र्यांना खातेवाटप होणार
July 12, 2023
शासकीय व न्यायालयीन कामांच्या प्रतिज्ञापत्रांसाठी स्टॅम्प पेपरची आग्रही मागणी करूच नये,शासनाचे आदेश पारित
November 1, 2024
हतनूर धरणाचे 36 दरवाजे उघडले, तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, 200000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आलाय
September 16, 2023