भुसावळातून राजू सुर्यवंशीचे बॅनर हटवावे – समाज अध्यक्ष मिथुन बारसेंची पोलिसांना विनंती

भुसावळ दि-०९/०४/२५, शहरात महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध बॅनर लागलेले असून काही बॅनरवर कै.संतोष बारसे व कै.सुनील राखुंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील आरोपी आणि तडीपार आरोपी राजु भागवत सुर्यवंशी याचे फोटो छापलेले असुन सदर व्यक्तीचे फोटो असलेले बॅनर्स उतरविण्याकरीता मेहतर वाल्मिकी समाज अध्यक्ष मिथुन बारसे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. याप्रसंगी अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे प्रदेश सचिव संतोष थामेत आणि मेहतर वाल्मिकी समाजातील इतर प्रतिष्ठित व्यक्ती व समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, भुसावळ शहरातील शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम अबाधित राखण्यासाठी आणि पोलिसांचा वचक निर्माण करण्यासाठी आणि गुन्हेगारीचे उच्चाटन होणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा दुहेरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचे फोटो छापल्याने वाल्मिकी समाजबांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शांतीचे व अहिंसेचे पुरस्कर्ते होते, त्यांनी कधीही अशा हिंसक वृत्तीच्या व्यक्तींचे किंवा गुन्हेगारीचे समर्थन केलेले नाही. त्यामुळे अशा महामानवाच्या फोटो शेजारी अशा गुन्हेगारी स्वरूपाच्या व्यक्तीचे फोटो प्रदर्शित करणे चुकीचे आहे. त्यामुळे असे बॅनर हटविण्यात यावे, अशी विनंती मिथुन बारसे यांनी भुसावळचे उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस प्रशासनाला केलेली आहे.यातील काही बॅनर पोलिस प्रशासनाने हटविलेले असल्याची माहिती समोर आली आहे.