Advertisement नंदग्राम गोधाम वाटरपार्क,अंजाळे
अर्थकारणक्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

रोहिणी एकनाथ खडसेंनी विधानसभा निवडणूकीचा लाखोंचा खर्च लपविला, पुरावे असूनही तक्रारदार ‘त्रयस्थ’ म्हणून अधिकाऱ्यांनी कारवाई टाळली

तत्कालीन अनेक अधिकारीही येणार गोत्यात

जळगाव दि-१०/०४/२५, गेल्या वर्षी नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातील निवडणुक प्रक्रियेत निवडणूक अधिकाऱ्यांकडून आणि उमेदवारांकडून हेतूपूर्वक केला गेलेला अनागोंदी कारभार आता समोर आलेला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार रोहिणी एकनाथ खडसे यांनी चक्क त्यांचा लाखोंचा निवडणूक खर्च लपवलेला असल्याची माहिती तेव्हा माहिती अधिकार कायद्यान्वये समोर आलेली होती. दिनांक १४/११/२०२४ रोजी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या सावदा ता.रावेर या शहरामध्ये दुपारी रोहिणी एकनाथ खडसे यांनी त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ केलेल्या रोडशो करण्यासाठी निवडणूक विभागाकडून आवश्यक असलेल्या विविध प्रकारच्या अधिकृत परवानग्या घेतल्या नसल्याची माहिती समोर आलेले आहे. या रोडशो मध्ये तीन वेगवेगळ्या प्रकारचे चारचाकी वाहने वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. विशेष म्हणजे खडसेंनी त्या दिवशी झालेल्या निवडणुक खर्चाच्या हिशोब पत्रकामध्ये त्या तीनही चार चाकी गाड्यांचे भाडे, त्यांचे इंधन, चालकाचा वाहन भत्ता , आणि त्या चार चाकी गाड्यांवर लावलेले प्रचारार्थ बॅनर या सर्वांचा खर्च हिशेब पत्रकातून लपवलेला आहे. विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी असणाऱ्या सर्वच प्रमुख अधिकाऱ्यांनी या बेकायदेशीर रोडशो कडे आणि निवडणूकीच्या संवैधानिक कर्तव्यात हेतूपूर्वक कानाडोळा केल्याचे समोर आलेले आहे. यात महसूल आणि पोलीस विभागाचे अधिकारी यांचा प्रामुख्याने समावेश होतो. विशेष बाब म्हणजे या रोडशोसाठी प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे हेलिकॉप्टरने दाखल झालेले होते. तसेच या रोड शोमध्ये पंजाब राज्यातून पंजाब पासिंगची ओपन डेस्क चार चाकी गाडी मागवण्यात आलेली होती. भारत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार परराज्यातून निवडणुकीच्या प्रचारार्थ एखादी गाडी वापरायचे असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असताना, या ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता कायदा पायदळी तुडवत ,बेकायदेशीपणे या चार चाकी गाडीचा वापर करून तिचा संपूर्ण खर्च लपवण्यात आलेला आहे. अन्य दोन चारचाकी वाहनांची सुद्धा  अधिकार्‍यांकडून कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आलेली नसल्याचे माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून उघडकीस आलेले आहे.

सावदा शहरातील रोड शो

विशेष म्हणजे मा. मुंबई उच्च न्यायालयाने निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत अल्पवयीन बालकांचा वापर न करण्याचे आदेश दिलेले असतानाही, रोहिणी खडसे यांनी अल्पवयीन बालकांचा प्रचारासाठी वापर केला होता. ते सुद्धा तक्रारीत नमूद करण्यात आलेले होते. त्याबाबत सुद्धा कोणतीच उचित कार्यवाही निवडणूक अधिकाऱ्यांकडून झालेली दिसून येत नाही.
तक्रार असूनही ५ महिने कारवाई झालीच नाही
याप्रकरणी जळगाव जिल्हा मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे त्याच दिवशी म्हणजे निवडणुकीच्या मतदानाच्या काही दिवस अगोदरच यासंबंधी व्हिडिओ क्लिप्स आणि इतर सक्षम पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यात आलेली होती. या तक्रारीत उमेदवार रोहिणी खडसे आणि संबंधित निवडणूक अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्यावर आचारसंहितेचा भंग करणे , निवडणुकीचा खर्च लपविणे, आणि निवडणुकीच्या संवैधानिक जबाबदारीकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी भारतीय निवडणूक आयोगाच्या कायद्यातील विविध तरतुदीप्रमाणे आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली होती. सदरील कारवाई ही त्याचवेळी करणे बंधनकारक असताना त्याकडे कानाडोळा केल्याचे समोर आले आहे. जिल्हाधिकारी यांनी ती तक्रार त्याच दिवशी मुक्ताईनगर विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे वर्ग करून तक्रारीच्या अनुषंगाने योग्य ती उचित कार्यवाही करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याचे आदेश दिलेले होते. मात्र मुक्ताईनगरचे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सदरील प्रकरणात भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार त्याचवेळी सबळ पुरावे उपलब्ध असताना आचारसंहिताभंगाचे गुन्हे दाखल करणे अभिप्रेत असताना, त्यावर आजपावेतो कोणतीच उचित कार्यवाही केलेली नाही. यातील तक्रारदार यांना ‘त्रयस्थ‘ म्हणून फेब्रुवारी २०२५  महिन्यात निघालेल्या एका शासन परिपत्रकानुसार सदरील तक्रार आता तब्बल सहा महिन्यानंतर निकाली काढण्यात आलेली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी लवकरच मुंबई उच्च न्यायालयात तक्रारदारातर्फे रिट याचिका दाखल करण्यात येणार आहे.
  (भाग १ क्रमशः)

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button