रावेर येथे कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने शिबिरात ४ हजार ५०० दिव्यांग लाभार्थ्यांना वाटप
जळगाव,दि.२४ सप्टेंबर “सेवा सप्ताह” अंतर्गत रावेर येथे दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिरात ४ हजार ५०० दिव्यांग लाभार्थ्यांना ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन, खासदार रक्षा खडसे व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. यात रावेर तालुक्यातील २५० लाभार्थ्यांचा समावेश आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर (ALIMCO) यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप” शिबिराचे रावेर येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.
भुसावळचे आमदार संजय सावकारे, शिरीष चौधरी, उपविभागीय अधिकारी कैलास कडलग, तहसीलदार बंडू कापसे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग, नंदकिशोर महाजन, अजय भोळे, रंजना पाटील, सुनिल पाटील, प्रल्हाद पाटील, पद्माकर महाजन, श्रीकांत महाजन,अमोल जावळे, अशोक कांडेलकर, भरत महाजन, विलास पाटील, नारायण चौधरी, राकेश पाटील, राजन लासूरकर, सौ.रेखा बोंडे, सुरेश धनके, पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार रक्षा खडसे, केंद्र शासनाच्या काळात अनेक योजना जनतेपर्यंत पोहचल्याने बदल होतांना दिसत आहे. ज्या दिव्यांग बांधवाना साहित्य मिळाले त्यांनी त्याचा वापर करून आपल्या अपंगत्वावर मात करून स्वाभिमानी जीवन जगावे.सरकार आधार देण्याचे काम करत आहे. प्रत्येक घटकासाठी सरकार काम करत आहे. युवकांसाठी स्टार्टअप योजनेने अनेकांना रोजगारांभिमुख केले आहे.त्यांचे जीवनमान उंचावत आहे.
जिल्हाधिकारी यांनी एनसीसी विद्यार्थी यांचे केले कौतुक समाज कल्याण विभाग, महसूल विभाग, पंचायत समिती, नगरपालिका रावेर, सावदा, पोलीस विभाग, आरोग्य विभाग व नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.