क्राईम/कोर्टजळगावमहाराष्ट्रमुंबईराजकीय

IPS प्रियंका मीणा रावेर मतदार संघासाठी पोलीस निरीक्षक म्हणून जिल्ह्यात दाखल

जळगाव दि.22 – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघाकरिता सर्वसामान्य निरीक्षक निश्चित करण्यात आले असून गुजरात केडरचे 2004 बॅचचे IAS अधिकारी राहुल बाबुलालभाई गुप्ता यांची जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे जळगावांत आगमन झाले असून नागरिक त्यांना 8275970667 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी करू शकतात.तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी 2004 च्या बॅचचे IAS अधिकारी अशोक कुमार मीना सामान्य निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचेशी नागरिक 8275970668 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रारी करू शकता.तसेच प्रियंका मीना ( आय.पी. एस ) यांची जळगाव जिल्ह्यासाठी पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.तिघाही निरीक्षकांसाठी अजिंठा विश्रामगृह येथे स्वतंत्र कार्यालय असणार असून राजकीय पक्ष उमेदवार व मतदार अजिंठा विश्रामगृह येथे असलेल्या कार्यालयात किंवा भ्रमणध्वनीवर संपर्क साधू शकता असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी कळविले आहे.

Show More

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button