Advertisement
महाराष्ट्रमुंबईराजकीय

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभेसाठी १७ उमेदवार घोषित


मुंबई, दिनांक 27 मार्च, आज सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  लोकसभा 2024 च्या निवडणुकांसाठी राज्यातील १७ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांची घोषणा केलेली आहे. या यादीत एकूण १७ जागांवर उमेदवारांची नावे असून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

१) बुलढाणा- नरेंद्र खेडेकर.

२) यवतमाळ वाशीम -संजय देशमुख

३)मावळ- संजोग वाघेरे पाटील

४) सांगली – चंद्रहार पाटील

५) हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर

६) संभाजीनगर- चंद्रकांत खैरे

७)धाराशिव – ओमराजे निंबाळकर

८) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे

९) नाशिक – राजाभाऊ वाजे

१०) रायगड – अनंत गीते

११) सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत

१२) ठाणे -राजन विचारे

१३) मुंबई ईशान्य -संजय दिना पाटील

१४) मुंबई दक्षिण- अरविंद सावंत

१५) मुंबई वायव्य-अमोल कीर्तिकर

१६) परभणी – संजय जाधव

१७) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई

हे १७ उमेदवार घोषित केलेले असले तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा काही मोजक्या जागांवरील तिढा मात्र कायम आहे.तो आज रात्री पर्यंत सुटू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर आजच दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटातर्फे ही त्यांच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अधिक पुढील बातमी वाचा

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, विधी व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -9820203031

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp