सेल्फी घेण्यासाठी थांबलेल्या महिलेवर चाकूचा धाक दाखवून 8 जणांचा सामुहिक बलात्कार, 45,000 रू सुद्धा लुटले
बुलढाणा जिल्ह्यातील धक्कादायक घटना
बुलढाणा दि:-14 जिल्ह्यातील राजूर घाटात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रस्त्याच्या कडेला सेल्फी घेण्यासाठी थांबलेल्या एका 35 वर्षीय महिलेवर
चाकूचा धाक दाखवून तब्बल 8 जणांनी आळीपाळीने सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घडलेली आहे.तसेच तिच्याकडील 45 हजार रुपयेही लुटून आरोपी पसार झालेले आहेत. पीडित महिला आणि पुरुष दोघेही खडकी या त्यांच्या गावी जात असताना हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेमुळे बुलढाण्यात जिल्ह्यात मोठी खळबळ उडालेली आहे.
पीडित महिला आणि पुरुष दोघेही खडकी गावी जात होते. त्यावेळी राजूर घाटातील देवीच्या मंदिराजवळ सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. त्याचवेळी आठ जणांचं टोळकं आलं.चाकूचा धाक दाखवून त्यांनी या दोघांना प्रचंड मारहाण केली. त्यानंतर या महिलेला दरीत ओढत नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. याप्रकरणी बोराखेडी पोलिस ठाण्यात 8 आरोपींविरुद्ध भा.दं.सं. कलम 376,307आणी 395 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास उशीर केल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात तीन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्री उशिरा गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
घटनाक्रम असा घडला
बुलढाणा मलकापूर मार्गावरील राजुर घाटात निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. त्याप्रमाणे एक महिला आणि तिचा नातेवाईक मित्र देवीच्या मंदिर परिसरात गेले होते. दुपारच्या सुमारास त्या ठिकाणी आलेल्या आठ जणांनी महिलेसोबत असलेल्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोख रक्कम लुटून घेतली.
त्याच्यासमोर सदर महिलेलाही चाकूचा धाक दाखवून तिच्यावर आठ जणांनी आळीपाळीने बलात्कार केला. तशी तक्रार या तरुणाने बोराखेडी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. दरम्यान बोराखेडी पोलीस ठाण्यात अप्पर पोलीस अधीक्षक बाबाराव महामुनी, बुलढाणा शहर ठाणेदार प्रल्हाद काटकर उपस्थित होते. बलात्कार केल्यानंतर हे आरोपी चाकूचा धाक दाखवूनफरार होत असताना तक्रारकर्त्याने त्यांचा पाठलाग केला असता हे आरोपी मोहेगाव येथे गेले. मोहेगावच्या लोकांनी त्यातील एक आरोपी राहुल राठोड नावाचा असल्याची माहिती तक्रारकर्त्याला दिली आहे.
यापूर्वी देखील याच राजुर घाटात बरेचदा बलात्काराच्या घटना घडल्या असल्याची माहिती आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. मात्र बदनामी पोटी तक्रारी दाखल केल्या जात नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.