जळगाव ,दिनांक: 4 जून, जळगाव लोकसभा भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभेतील विधानसभेच्या मतदारसंघनिहाय मिळालेल्या मतदानाची आकडेवारी समोर आलेली आहे. चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून स्मिता वाघ यांना एक लाखाचे मताधिक्य मिळवून देण्याचा दावा करणारे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मतदारसंघातून फक्त 16 हजार 327 मतांचा लीड मिळाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्यासाठी मोठी धक्कादायक बाब मानली जात आहे.
विधानसभा | स्मिता वाघ | करण पवार | स्मिता वाघ यांना ‘लीड’ |
जळगाव शहर | 132124 | 70406 | 61718 |
जळगाव ग्रामीण | 126992 | 63852 | 63140 |
अमळनेर | 115428 | 44358 | 71070 |
एरंडोल | 94792 | 72707 | 22085 |
चाळिसगाव | 105260 | 88933 | 16327 |
पाचोरा | 97523 | 80957 | 16566 |