महाराष्ट्रमुंबईराजकीय

आज राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, राज्यातील ‘या’ वाहनांना आज मध्यरात्रीपासून टोल माफी

मुंबई दिनांक -14/10/2024 आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर येत आहे. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा निर्णय शिंदे सरकारने दिला आहे. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोल नाक्यांवर टोल माफी देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळात ही मोठी घोषणा केली आहे.


दरम्यान, मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली. या पुलांचा खर्च वसूल करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारांवर सर्वप्रथम टोलनाके उभारण्यात आले होते. पुल उभारणीचे काम अंतिम टप्यात येताच टोलनाके उभारण्यासाठी १९९९ मध्ये निविदा काढण्यात आली होती. त्यानंतर २००२ मध्ये हे पाचही टोलनाके सुरु करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईमध्ये प्रवेशद्वारावर टोल वसुली सुरू झाली होती. गेल्या २२ वर्षांपासून मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल आकारण्यात येत आहे.     

दरम्यान, मुंबईतील सर्व टोल माफ करण्यात यावे, यासाठी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाकडून वारंवार आंदोलन करण्यात येत होते. याकरता अनेकदा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची देखील भेट घेतली होती. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने घेतलेला हा मोठा निर्णय वाहनधारकांना दिलासा देणारा असल्याचे बोलले जात आहे.

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button