इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी नरेंद्र मोदींना विजयाबद्दल दिलायं खास संदेश
मोदींचे अनेक राष्ट्राध्यक्षांनी केले अभिनंदन
नवी दिल्ली, दि-5 जून 2024 , गेल्या दिड महिन्यापासून सुरू असलेल्या देशातील लोकसभा निवडणुका आटोपल्या असून काल लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेले आहेत. कालच्या पक्षीय बलाबल नुसार भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात NDA 290 जागांसह बहुमताच्या जवळपास पोहोचलेली दिसून येत आहे. गेल्या दहा वर्षांपासून देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार कार्यरत आहे. आता सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखालील सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
दरम्यान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले असून त्यांचे देशातच नव्हे तर अन्य देशातील राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रपतींनी सुद्धा अभिनंदन केलेले आहे.
नरेंद्र मोदींचं अभिनंदन करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक चर्चेत आहेत त्या म्हणजे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी
ह्या आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Giorgia Meloni) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर नवीन निवडणुकीच्या विजयासाठी आणि चांगल्या कामासाठी शुभेच्छा, अशी पोस्ट केलेली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय की, इटली आणि भारत यांना एकत्र आणणारी मैत्री आणि आपल्या राष्ट्रांच्या आणि लोकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर आम्ही एकत्र काम करत राहू, असं म्हणत त्यांनी PM मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत