ईडीच्या दबावामुळे राष्ट्रवादीतले लोक भाजपात गेले हे एक थोतांड – मंत्री ना.अनिल पाटील मदत व पुनर्वसन मंत्री
रोहित पवारांना ना.अनिल पाटील यांचे प्रत्युत्तर
जळगाव महसूल अधिकाऱ्यांना जिल्हा नियोजनमधून नवीन चारचाकी वाहने उपलब्ध
जळगाव दि:21 ऑगस्ट – मी आधी भाजपमध्ये होतो भाजप नंतर मग मी राष्ट्रवादी मध्ये आलो… मी ज्यावेळी भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी माझ्यावर भाजपचा दबाव पाहिजे होता.कारण त्यावेळी. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती.माझ्यावर ईडीचा दबाव असता तर मी मंत्री कसा झाला असतो आज सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा मंत्री झाला आहे. त्यामुळे माझ्यावर कुठलाही दबाव नाही.हे सर्व थोतांड आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी अजित पवार यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या निर्णयाच्या पाठीमागे केवळ आमदार खासदार नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आहे. अशी प्रतिक्रिया मंत्री ना अनिल पाटील यांनी शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर दिली आहे.
तसेच ना.पाटिल पुढे म्हणाले की, भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे काय बोलले त्याबद्दल मला माहित नाही मात्र राष्ट्रवादी फुटलेले नाही तर संपूर्ण राष्ट्रवादी आमच्याकडे असून अजित पवार यांच्या पाठीशी आहे. असा दावाही यावेळी मंत्री अनिल पाटील यांनी केला.कुणी कुणासोबत राहावं हा त्याच्या त्याच्या मर्जीचा प्रश्न आहे.आज खऱ्या अर्थाने नेतृत्व आहे अजितदादांना मानलं जातं.तसेच जनता व कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर आहे. आमदार रोहित पवारांनी केलेल्या टीकेवर अजित पवार गटाच्या जळगावतील मंत्री अनिल पाटील यांनी उत्तर दिलं आहे. इकडच्या नाही तर तिकडच्या आमदारांचे मतपरिवर्तन होत आहे आणि याचं खरं कारण म्हणजे विकास आहे.अजित पवारांना पाठिंबा देणे साठीच हे मतपरिवर्तन होत आहे.विकास हा महत्त्वाचा असून तोच आमचा मुख्य अजेंडा आहे.आहे अशी प्रतिक्रिया मंत्री ना.अनिल भाईदास पाटील यांनी दिली आहे.