आरोग्यजळगावमहाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्रात ‘या’ दिवशी गारपीटीचा तडाखा बसण्याची शक्यता, हवामान खात्याचा इशारा

पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा

मुंबई दि-७ एप्रिल, संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा अवकाळीचं ढग दाटून आलेलं आहे. राज्यातील काही भागात पुढील तीन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. सोबतच गारपिटीचा  इशारा देखील देण्यात आला आहे.
त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात 8 एप्रिल ते 13 एप्रिल या काळात विदर्भात ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट होणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्यानं शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी असं आवाहान त्यांनी केलं आहे.

उद्यापासून पूर्व विदर्भापासून पावसाला सुरुवात होणार आहे, गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे. पश्चिम विदर्भातही पाऊस पडणार असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून  वाऱ्याची दिशा उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्यास कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन विजेच्या कडकडाटासह पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस पडू शकतो असा अंदाज पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याच्या कुलाबा वेधशाळेने सुद्धा उत्तर महाराष्ट्रात पावसाचा इशारा दिलेला आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाचा अंदाज आहे. काही भागात गारपीट देखील होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन डख यांनी केलं आहे.
कोकण किनारपट्टी आणि इतर महाराष्ट्रात देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे .
मराठवाड्याबाबत सांगायचे झाल्यास मराठवाड्यात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे. मात्र हा पाऊस मर्यादित भागात असणार आहे. पंरतु काही भागांना अवकाळीचा तडाखा बसणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तविलेला आहे.

Credit source -punkabrao dakh & imd mumbai

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button