रावेर लोकसभा मतदार संघासाठी राष्ट्रवादी शरदचद्र पवार गटाकडून यांना मिळाली उमेदवारी
मुंबई दि-8 एप्रिल ,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे काल काही मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली होती. मात्र रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सस्पेन्स कायम ठेवण्यात आलेला आहे. या मतदारसंघासाठी उमेदवाराची घोषणा झालेली नसली तरी भुसावळचे माजी आमदार संतोष भाऊ चौधरी यांनी त्यांना शरद पवार साहेबांनी उमेदवारीसाठी ग्रीन सिग्नल दिल्याचा दावा केलेला होता. मात्र त्याच्या दोन दिवसांनंतर मुक्ताईनगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ॲड. रवींद्र भैय्या पाटील यांना उमेदवारी मिळावी म्हणून ठराव करण्यात आला होता,आणि त्याबाबतं मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या बॅलार्ड इस्टेट कार्यालयात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या नेत्यांच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली होती. या बैठकीत रावेरच्या जागे संदर्भात इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या नावावर तब्बल तीन तास चर्चा झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. यात सर्वात आघाडीवर असलेले नाव म्हणजे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी ह्यांचे होते. मात्र आज रवींद्रभैय्या पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. आज संध्याकाळी त्यांच्या नावाची घोषणा होणार आहे.