केंद्रीय निवडणूक आयोगाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला केले तडकाफडकी निलंबित
डीएस कुटे 1997 च्या आयपीएस महाराष्ट्र केडर बॅचचे अधिकारी
नवी दिल्ली (AIR) दिनांक: 29 मे- D S kutey | भारतीय निवडणूक आयोगाने वरिष्ठ IPS अधिकारी धिरेंद्र संभाजी कुटे (DS kutey) यांना निलंबित केलेले आहे. धिरेंद्र संभाजी कुटे हे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे विशेष सचिव ( special OSD)म्हणून कार्यरत होते.
ओडिशा राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेण्यावर थेट अवाजवी प्रभाव टाकल्याचा आरोप डी एस कुंटे या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यावर ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करण्यात आलेले आहे. डी एस कुटे हे 1997 च्या महाराष्ट्र केडर बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या आचारसंहिता मार्गदर्शक तत्वांचे जबाबदार अधिकारी असूनही नियमांचे पालन न करता उल्लंघन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली आहे.
याबाबत ऑल इंडिया रेडिओने X अकाउंटवर ट्विट करून याबाबत माहिती दिलेली आहे.
दरम्यान, सावत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने यावर्षी केंद्रीय निवडणूक आयोगाने एखाद्या वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याला आचारसंहिता काळात बेजबाबदारपणे वर्तवणूक करून निवडणूकांवर अवाजवी प्रभाव टाकल्याप्रकरणी निलंबित करण्याची हि पहिलीच वेळ आहे. तसेच गेल्या काही वर्षांत अशा प्रकारची धडक कारवाई करण्याची निवडणूक आयोगाची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग कटाक्षाने वरिष्ठ अधिकारांवर लक्ष ठेवत असून निवडणूक आयोग ‘ॲक्शन मोड’ मध्ये आल्याचे दिसून येत आहे.