जळगावात घरफोडी प्रकरणी चार आरोपींना अटक; ३४ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलीस अधीक्षक यांची वाढदिवसानिमित्त पिडीतांसाठी शुभ वार्ता

जळगाव : दिनांक –२६/०९/२५,रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत मोहाडी रोडवरील न्यू पार्वतीबाई काळे नगरात घडलेल्या घरफोडी प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील एकूण ३४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे. फिर्यादी लिलाधर शांताराम खंबायत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे साडू नरेंद्र वाघ परदेशी गेले असल्याने १५ मे २०२५ ते १ जून २०२५ या कालावधीत अज्ञात आरोपींनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. गुन्हा रामानंद नगर पोलीस स्टेशनमध्ये बीएनएस कलम ३०५-ए, ३३१ अंतर्गत नोंदवण्यात आला.
चोरीस गेलेल्या वस्तूंची यादी (एकूण किंमत ३६ लाख ८३ हजार रुपये) :
१. ४० ग्रॅम वजनाच्या ४ सोन्याच्या बांगड्या (किंमत: ४ लाख रुपये)
२. २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र असलेली पोत (किंमत: २ लाख ५० हजार रुपये)
३. ३० ग्रॅम वजनाच्या ३ सोन्याच्या चैन (प्रत्येकी १० ग्रॅम; किंमत: ३ लाख रुपये)
४. ८ ग्रॅम वजनाची सोन्याची लहान चैन (किंमत: ८० हजार रुपये)
५. २०० ग्रॅम वजनाचे ४ सोन्याचे बिस्किट (प्रत्येकी ५० ग्रॅम; किंमत: २० लाख रुपये)
६. २५ ग्रॅम वजनाच्या ५ सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी ५ ग्रॅम; किंमत: २ लाख ५० हजार रुपये)
७. ८ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी ४ ग्रॅम; किंमत: ८० हजार रुपये)
८. ४ ग्रॅम वजनाच्या २ सोन्याच्या कानातील रिंग (प्रत्येकी २ ग्रॅम; किंमत: ४० हजार रुपये)
९. ४ ग्रॅम वजनाच्या २ नाकातील फुली (प्रत्येकी २ ग्रॅम; किंमत: ४० हजार रुपये)
१०. ४ ग्रॅम वजनाच्या २ कानातील रिंग (प्रत्येकी २ ग्रॅम; किंमत: ४० हजार रुपये)
११. ४ ग्रॅम वजनाच्या २ लहान अंगठ्या (प्रत्येकी २ ग्रॅम; किंमत: ४० हजार रुपये)
१२. ३ ग्रॅम वजनाचे ३ सोन्याचे कॉईन (प्रत्येकी १ ग्रॅम; किंमत: ३० हजार रुपये)
१३. २ ग्रॅम वजनाचा १ सोन्याचा तुकडा (किंमत: २० हजार रुपये)
१४. २५० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या वस्तू (कमर पट्टा १ नग, चांदीचा छल्ला २ नग, चांदीचे शिक्के ९ नग, चांदीच्या पायातील साखळ्या २ नग, चांदीचे जोडवे २ नग, चांदीची वाटी १ नग, चांदीचे वाळे २ नग, चांदीची डबी १ नग; किंमत: २५ हजार रुपये)
१५. ८५ हजार रुपयांची रोख रक्कम (५०० व १०० रुपयांच्या भारतीय चलनी नोटा)
१६. दाहुआ कंपनीचा डीव्हीआर वायफाय मॉडेम (किंमत: ३ हजार रुपये)
(एकूण सोने: ३५७ ग्रॅम, किंमत ३५ लाख ७० हजार; चांदी: २५० ग्रॅम, किंमत २५ हजार; इतर: ८८ हजार रुपये)
तपास आणि अटक :
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, एसडीपीओ नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या नेतृत्वात तपास सुरू होता. १९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्र गस्तीदरम्यान संशयित रवी प्रकाश चव्हाण (वय २१, रा. तांबापुरा, जळगाव) आणि शेख शकील शेख रफिक (वय ३९, रा. सालार नगर, जळगाव) यांना पकडण्यात आले. त्यांच्या चौकशीतून त्यांनी गुन्हा कबूल केला आणि साथीदारांची नावे सांगितली. त्यानुसार २० सप्टेंबर २०२५ रोजी जुनेद उर्फ मुस्तकीम भिकन शहा (रा. शिरसोली, जळगाव) आणि गुरुदयालसिंग मनजित टाक (रा. शिरसोली नाका, जळगाव) यांना अटक करण्यात आली.
जप्त मुद्देमाल :
आरोपींनी सोने-चांदी सुरत आणि जामनेर येथे विकल्याचे कबूल केले. पोलिसांनी सुरत आणि जामनेरमधून ३१० ग्रॅम सोन्याची लगड (किंमत: ३३ लाख ७९ हजार), २५० ग्रॅम चांदीची लगड (किंमत: २५ हजार) आणि एमएच-१९-बीडब्ल्यू-९१४४ क्रमांकाची अॅक्टिवा दुचाकी (किंमत: ४५ हजार) असा एकूण ३४ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या तपासात दोन घरफोडी आणि एक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आले.
तपासात सहभागी अधिकारी :
सपोनि भूषण कोते, पोलीस हवालदार जितेंद्र राजपूत, जितेंद्र राठोड, सुशील चौधरी, सुधाकर अंभोरे, पोलीस नाईक योगेश बारी, विनोद सूर्यवंशी, अतुल चौधरी, रेवानंद साळुंखे, हेमंत कळसकर, पोशि अनिल सोननी, नितेश बच्छाव, गोविंदा पाटील, दिपक वंजारी आणि चालक प्रमोद पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.













