क्राईम/कोर्टजळगावमुंबई

झुलेलाल वॉटरपार्कच्या मालकाला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड,जळगावचे प्रांताधिकारी यांची सर्वात मोठी कारवाई

पत्रकार मयुरेश निंभोरे यांच्या तक्रारीची दखल, विविध विभागांकडूनही होणार मोठ्या दंडाची वसुली

#Zulelalwaterpark news | जळगाव ,दि-07/11/24, जळगाव तालुक्यातील शिरसोली परिसरातील नागझिरी गावाच्या शिवारात गेल्या चार वर्षांपासून मोठा गाजावाजा करून कोणत्याही प्रकारचा शासकीय परवाना न घेता अनधिकृतपणे सुरू असलेल्या झुलेलाल वाटरपार्क अँड रिसॉर्टच्या जागामालकाकडून जागेच्या सातबारा उताऱ्यावर पिकपेरा म्हणून कापूस व हरभरा पिकांची नोंद करून प्रत्यक्षात त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे शेती पिकांचे उत्पादन न करता अनधिकृतपणे बांधकाम करून वॉटरपार्कच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न घेण्यात येत होते, आणि याबाबत शासनाचा लाखो रुपयांचा महसूल दरवर्षी बुडवण्यात येत होता. याबाबत भुसावळ येथील mediamail.in news चे पत्रकार मयुरेश निंभोरे यांनी माहिती अधिकारातून या प्रकल्पाची सविस्तर माहिती काढून सदरील प्रकल्प हा अनधिकृत असून वॉटरपार्क साठी लागणाऱ्या विविध प्रकारचे शासकीय परवाने प्रकल्पाच्या मालकाकडे नसल्याचे उघडकीस आलेले होते. त्यामुळे सदरील वॉटरपार्कच्या परवान्यांची पडताळणी आणि सखोल चौकशी व्हावी, आणि कायदेशीर व नियमोचित दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी लेखी तक्रार जळगावचे तत्कालीन प्रांताधिकारी महेश सुधळकर यांचेकडे लेखी स्वरुपात करण्यात आलेली होती,मात्र त्यांनी याकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केलेले होते. याबाबत त्यांची मंत्रालयातील अप्पर मुख्य सचिव यांच्याकडे माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीच्या पुराव्यांसह लेखी स्वरुपात तक्रार करण्यात आली होती. त्या अनुषंगाने त्यांची धुळे आणि त्यानंतर आता पुणे येथे बदली करण्यात आलेली आहे. त्यानंतर नव्याने रुजू झालेले कर्तव्यनिष्ठ प्रांताधिकारी श्री विनय गोसावी यांच्याकडे सदरील वॉटरपार्कवर कायदेशीर आणि दंडात्मक कार्यवाही होणे संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. याबाबत प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी पत्रकार मयुरेश निंभोरे यांना सकारात्मक प्रतिसाद देत सहसंचालक नगर रचना जळगाव, तहसीलदार जळगाव, तलाठी आणि मंडळाधिकारी नागझिरी ता.जळगाव, यांच्याकडून या प्रकल्पासंदर्भात सविस्तर यथोचित आणि वस्तुस्थितीदर्शक चौकशी अहवाल मागविल्यानंतर सदरील चौकशी अहवालांच्या आधारे आणि तक्रारदार पत्रकार मयुरेश निंभोरे यांच्या तक्रारीतील पुराव्यांचे तथ्य लक्षात घेऊन झुलेलाल वॉटरपार्क अँड रिसॉर्टच्या जागामालकांना सदरील वॉटर पार्कची अकृषक जागा काही अटी व शर्तींच्या अधीन राहून तात्पुरती बिनशेती करून देऊन तब्बल 1लाख 37,940 रूपयांचा केल्यानंतर याबाबत जळगावचे प्रांताधिकारी यांनी तब्बल दंड ठोठावलेला आहे. विशेष म्हणजे दंड ठोठावल्यानंतर फक्त नऊ दिवसात संपूर्ण दंडाची रक्कम वसुल करण्यात आलेली आहे.

👆ही बातमी देखील वाचा

भुसावळातील ‘त्या’ वाईन शॉपमध्ये अल्पवयीन बालकाचा वापर केल्याप्रमाणी कारवाई करण्याचे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://mediamail.in/भुसावळातील-त्या-वाईन-शॉप/

Show More

MAYURESH NIMBHORE

या वेबसाईटवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या लिंक वरून खरेदी किंवा कोणताही व्यवहार करताना स्वतःच्या जबाबदारीने करावा. त्यास आम्ही जबाबदार नाही. लेखकाबद्दल - मयुरेश निंभोरे हे पत्रकार व माहिती अधिकार कार्यकर्ता असून गेल्या 9 वर्षांपासून राजकीय, गुन्हे विषयक, व न्यायालयीन निकालांचे वृत्त प्रकाशित करतात. संपर्क -09820203031

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button