दिपनगर वीजनिर्मिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते ध्वजारोहण
भुसावळ, दि:१५/०८/२०२४, भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादितचे विज निर्मिती केंद्रातील क्लब परिसरात स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केंद्राचे प्रमुख मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
त्यावेळी उपमुख्य अभियंता अशोक भगत यांच्या सह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टर, मजूर , स्थानिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनचा उपक्रम
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण केंद्र दीपनगर यांच्या कार्यालयासमोर स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न करण्यात आला.यावेळी
ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष,अशोक भगत, उपमुख्य अभियंता भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजेश पवार व्यवस्थापक वित्त लेखन विभाग ,भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर,
विशेष उपस्थिती म्हणून श्री प्रकाश सरदार वंचित बहुजन कंत्राटदार संघटना प्रदेशाध्यक्ष,श्री.प्रफुल्ल आवारे कामगार कल्याण गुणवंत कामगार ,भुसावळ, औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर , सौ रंजना संजय पाटील, ग्रंथपाल जनता विद्यालय शिंदखेडा तसेच समाजसेवक शैलेंद्र सपकाळे , मिलिंद पाटील,संघटना प्रतिनिधी अनंत जाधव छगन पवार, स्वप्निल पाटील, संजय तायडे शारदा माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक वृंद महेंद्र सपकाळे, निलेशने येथे राहुल चौधरी, रूपाली राणी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोरकुमार मनोहर पाटील केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र दिपनगर यांनी केले
कार्यक्रमाच्या वेळी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्र येथील कामगार व कामगार कुटुंबीय बंधू, भगिनी व शारदा माध्यमिक विद्यालय दिपनगर येथील शिक्षक व विद्यार्थी तसेच बालविकास अंगणवाडी सेविका , तसेच अजय साळुंखे, समाधान सपकाळे, योगेश तायडे, शेळके उपस्थित होते.
आभार प्रदर्शन किशोरकुमार पाटील केंद्र संचालक कामगार कल्याण केंद्र दिपनगर यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी कामगार कल्याण केंद्र दिपनगर येथील कर्मचारी शारदा भावसार व ललित माळी यांनी परिश्रम घेतले.