नगरपरिषद-नगरपंचायत निवडणूकीसाठी रविवारी सुद्धा नामनिर्देशनपत्रे ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने स्वीकारणार

मुंबई, दि. १४ नोव्हेंबर २०२५ – राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मोठा दिलासा दिला आहे. उमेदवारांना नामनिर्देशनपत्रे रविवारी सुद्धा सादर करण्यासाठी ऑनलाइन तसेच ऑफलाइन (पारंपरिक) दोन्ही पद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आयोगाच्या १४ नोव्हेंबरच्या पत्रानुसार, १५ ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत (तीनही दिवस) रविवार (१६ नोव्हेंबर) सार्वजनिक सुट्टी असूनही सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या वेळेत उमेदवार आपली नामनिर्देशनपत्रे संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे थेट सादर करू शकतील.
आज दुपार पर्यंत फक्त ऑनलाइन पद्धतीने नामनिर्देशन स्वीकारले जात होते.
ऑनलाइन प्रणालीत तांत्रिक अडचणी आणि शेवटच्या दोन दिवसांत सर्व्हरवर ताण येण्याची शक्यता.
उमेदवारांना समान संधी देण्याच्या दृष्टीने हा निर्णय.
“उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी दोन्ही पद्धती उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.”
राज्य निवडणूक आयोग
सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ सूचना देण्यात आल्या असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आवश्यक तयारी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
टीप : नामनिर्देशनपत्रासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे उमेदवारांना बंधनकारक आहे.
(संदर्भ : राज्य निवडणूक आयोगाचे पत्र क्र. रानिआ/निका/नप-२०२५/प्र.क्र.१४/का.६, दि. १४/११/२०२५)*













