निवडणूकीनंतर राष्ट्रवादीसह अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये होणार विलीन ? शरद पवारांचा नेमका गौप्यस्फोट काय ?
उद्धव ठाकरे हे काँग्रेसचे समविचारी- शरद पवार
मुंबई:दिनांक-8 मे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याने चर्चांना प्रचंड उधाण आलेले आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पोटातूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झालेला असून वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. काँग्रेस आणि आमच्यात काहीच फरक नाही. यामुळे अनेक समविचारी प्रादेशिक पक्ष निवडणूकीनंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचे संकेत मिळालेले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे देशाच्या राजकारणातील जेष्ठ दिग्गज नेते म्हणून नेहमी चर्चेत असतात. अनेक वर्षे काँग्रेस पक्षात घालवल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली होती. परंतु त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट तयार झालेले आहेत. शरद पवार यांनी आता एका वृत्तपत्राला मुलाखत दिलेली असून त्यात अनेक धक्कादायक दावे केले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशातील प्रादेशिक पक्षांच्या भवितव्याबाबतही शरद पवारांनी मोठी विधाने केली आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असा दावा शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केलेला आहे.
त्याचवेळी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे देखील आपल्याच विचारधारेचे असून ते देखील समविचारी आहे, असा दावा शरद पवार यांनी मुलाखतीत केलेला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये खरच विलीन होणार आहे का ? अशा चर्चा पुन्हा एकदा आता सुरु झालेल्या आहेत.