
भाजपच्या स्मिता वाघ यांना महिलांनी खांद्यावर उचललं आहे.जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता उदय वाघ या दीड लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून आलेल्या असून शहरातील भाजप कार्यालयात महिला कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून एकच तुफान जल्लोष केला आहे.त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील पवार हे पराभूत झालेले आहे.याबाबत अधिकृत घोषणा होणे बाकी आहे.













