भुसावळचे डॉ राजेश मानवतकर यांना अचानक राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी जाहीर, राजकारणात खळबळ, तिरंगी लढत होणार
मुंबई दिनांक-26/10/24, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यात 23 जणांची नावं आता जाहीर करण्यात आली आहेत. यात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून डॉ राजेश मानवतकर यांचे नाव काँग्रेसच्या यादीत प्रथम क्रमांकावर आल्याने खळबळ उडाली आहे. कारण काँग्रेसकडून सर्वात प्रबळ दावेदार म्हणून प्रिती तोरण महाजन आणि अनुप कुमार मनुरे यांची नावे सर्वात आघाडीवर होती. ही नावे काँग्रेस काय कामांना टाकण्यात आलेली होती मात्र आता काँग्रेसच्या यादीत अचानक डॉ राजेश मानवतकर यांचे नाव जाहीर झाल्याने भुसावळच्या राजकारणात मध्ये खळबळ उडालेली आहे. डॉ राजेश मानवतकर यांना मिळालेल्या काँग्रेसच्या उमेदवारी मध्ये माजी आमदार संतोष चौधरींची नेमकी भूमिका काय आहे ? हे अजून तरी समोर आलेले नाही. त्यामुळे तर्कवितर्कांनाना उधाण आलेले आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रदीप पवार यांनी भुसावळची जागा ही काँग्रेसला सुटल्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे भुसावळातील राजकीय अस्तित्व कमी झाल्याचे दिसून येत आहे.
यामुळे भुसावळातील महाविकास आघाडीत मोठी खळबळ उडालेली आहे. कारण डॉ राजेश मानवतकर यांनी भुसावळ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर काही दिवसांपासून सुरू झालेली होती. त्यामुळे अचानक काँग्रेस कडून डॉ राजेश मानवतकर यांना उमेदवारी मिळाल्याने त्यांची लढत आता भाजपचे विद्यमान आमदार संजय सावकारे आणि वंचितचे उमेदवार जगन सोनवणे यांच्याशी होणार आहे. त्यामुळे आता हे तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळालेले आहे. मात्र भुसावळ विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार संजय सावकारे यांचे पारडे जड मानले जात आहे. कारण भुसावळ नगरपालिका ,पंचायत समिती ,ग्रामपंचायती,कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका पणन बाजार समितीसह बहुतांश ग्रामपंचायतीवर आमदार संजय सावकारे समर्थक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची सत्ता अबाधित आहे. असेच राज्यातही महायुतीची सत्ता असल्याने आणि आमदार संजय सावकारेंच्या पाठीशी दिग्गज मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची मोठी ताकद असून भाजपच्या कार्यकर्त्यांचे भुसावळ शहरासह तालुक्यात मोठे संघटन कार्यरत आहेत. त्यामुळे डॉक्टर राजेश मानवतकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जगन सोनवणे यांना खूप मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेले डॉ राजेश मानवतकर हे विद्यमान आमदार संजय सावकारे यांचा अभेद्य किल्ला कसा लढवणार ? काय रणनीती आखणार ? याकडे भुसावळ तालुक्यातील जनतेचे लक्ष केंद्रित झालेले आहे. गेल्यावेळी त्यांच्या पत्नी डॉ मधु मानवतकर या अपक्ष लढून पराभूत झालेल्या होत्या. यांना 28 हजार मते मिळाली होती.