जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे ठार मारण्याची धमकी, पोलीस अधीक्षकांनी केला गुन्हा दाखल

जळगाव दि-१२/०४/२५, जळगावचे विद्यमान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे ठार मारण्याच्या धमकीचा मेल आलेला आहे. अज्ञात व्यक्तीने मुख्यमंत्री कार्यालयाला जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना जीवे मारण्या संदर्भातला मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हाधिकारी यांना जीवे ठार मारू असा उल्लेख सदरील ईमेल मध्ये करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाला हा मेल पाठविण्यात आलेला असून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. पोलिस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनेला दुजोरा दिला असून सदरील धमकीचा ई-मेल हा गांभीर्याने घेण्यासारखा नसल्याचे सांगितलेले आहे.
सायबर शाखेत गुन्हा दाखल – पोलीस अधिक्षक
दरम्यान, जळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार ,यापूर्वी देखील एक महिन्यापूर्वी काही पोलिस ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालयात काही दुखावलेल्या अज्ञात व्यक्तींच्या माध्यमातून अशा प्रकारच्या ई-मेलच्या माध्यमातून धमक्या देण्यात आलेल्या होत्या. अशा धमक्या गांभीर्याने घेण्याची गरज नसून याबाबत आम्ही सायबर गुन्हे शाखेत गुन्हा दाखल करून सदरील प्राप्त झालेल्या इमेलचा तांत्रिक तपास सायबर तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. अशी माहिती दिलेली आहे.