भुसावळच्या जगन उर्फ जगन्नाथ सोनवणेंंच शिक्षण फक्त १० वी पास,१७ गुन्हे दाखल, निवडणूक शपथपत्रावरून उघड
भुसावळ, दिनांक-08/11/2024, भुसावळ विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस जवळ येत चाललेली असून विद्यमान आमदार संजय सावकारे यांना भाजपने पुन्हा एकदा सलग तिसऱ्यांदा उमेदवारीची संधी दिलेली असून त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची खूप मोठी फौज शहरासह तालुक्यात अस्तित्वात आहे. विविध सहकारी व इतर संस्थांवर भाजपची सत्ता असून विद्यमान आमदार संजय सावकारे यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडे सक्षम आणि अनुभवी उमेदवार नसल्याने निवडणुकीचे वातावरण तापताना दिसत नसल्याची स्थिती दिसून येत आहे. विशेष म्हणजे भुसावळच्या राजकारणातील महत्त्वाचा चेहरा असलेले माजी आमदार संतोषभाऊ चौधरी यांनी अजूनही त्यांचे पत्ते ओपन केलेले नसल्याने ते नेमके कोणत्या उमेदवाराला त्यांचा पाठिंबा जाहीर करणार , याकडे भुसावळ तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे. विद्यमान आमदार संजय सावकारे यांचे विरोधात बहुतांश उमेदवार अनुभव नसलेले नवखे खेळाडू असून त्यांची राजकीय पाटी कोरी असल्याने ते विद्यमान भाजपचे आमदार यांचा सामना कसा करतात, याकडे भुसावळ विधानसभा मतदारसंघातील जनतेचे लक्ष लागून आहे. असे असताना भुसावळातील एक चर्चित चेहरा असलेले जगन उर्फ जगन्नाथ देवराम सोनवणे यांना वंचित बहुजन आघाडी कडून अनपेक्षितपणे अचानक उमेदवारी जाहीर झाल्याने अनेक राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावलेल्या होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनपेक्षितपणे उमेदवारी मिळवून खळबळ उडवून दिलेली होती. यावेळी जगन सोनवणे यांना ‘वंचित’ची उमेदवारी घोषित झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे भुसावळातील निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मोठा धक्का बसलेला असून त्यातील काही पदाधिकारी व कार्यकर्ते हे जगन सोनवणे यांच्यापासून अंतर राखून असल्याचे आतापर्यंत दिसून आलेले आहे. दोन दिवसांपूर्वी वंचित चे युवा नेते सूजात आंबेडकर यांच्या आगमनानंतर देखील काही कार्यकर्ते हे ‘नॉट रिचेबल‘ असल्याचे दिसून आलेले आहे.
जगन सोनवणेंच शिक्षण १० वी, 17 गुन्हे दाखल
जगन्नाथ उर्फ जगन सोनवणे यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये विविध प्रकारचे 17 गुन्हे दाखल असून त्यांची शैक्षणिक पात्रता ही केवळ दहावी पास असल्याचे त्यांच्या निवडणूक शपथपत्रावरून समोर आलेले आहे. जगन सोनवणे यांच्यावर दाखल असलेल्या सतरा गुन्ह्यांपैकी एकाही गुन्ह्यात त्यांच्यावर दोषसिद्धी झालेली नसून बहुतांंचे प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. तसेच त्यांच्या नावे मोंढाळे ता. भुसावळ शिवारात शेतजमीन असून त्या जमिनीचे चालू बाजार मूल्य हे ५९,९०,००० रूपये असल्याचे त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. तसेच त्यांच्यावर देना बँकेचे १,५०,००० रुपयांचे कर्ज असल्याचे देखील नमूद केलेले आहे.